Rupali Chakankar : भाजपचे नेते म्हणाले तिजोरीचा मालक आपला, आता रुपाली चाकणकर मैदानात उतरल्या, म्हणाल्या, 'अर्थमंत्री आपलाच, तिजोरीच्या चाव्याही आपल्याच हातात'
राज्यात आपली सत्ता आहे आणि तिजोरीच्या आपल्या हातात चाव्या आहेत. अर्थमंत्री आपला आहे, मत तुमचं निधी आमचा असेल, असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी कुर्डूवाडीतील जाहीर सभेत केले आहे.

Rupali Chakankar : राज्यात सत्ताधारी मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात लढत असताना लाडकी बहीण योजना असेल किंवा तिजोरीच्या चाव्या असतील या सर्वांवर प्रत्येक जण दावा करताना दिसत आहे. यामुळे जनतेत मात्र संभ्रम निर्माण होत असून खऱ्या चाव्या कुणाकडे? हा प्रश्न आता जनतेला पडला आहे. राज्यात आपली सत्ता आहे आणि तिजोरीच्या आपल्या हातात चाव्या आहेत. अर्थमंत्री आपला आहे, मत तुमचं निधी आमचा असेल, असे वक्तव्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या (Ajit Pawar NCP) नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी कुर्डूवाडीतील जाहीर सभेत केले आहे.
दरम्यान, अजितदादांच्या (Ajit Pawar) याच पद्धतीने केलेल्या वक्तव्यावर काल चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे, असे वक्तव्य केले होते. आता पुन्हा एकदा तिजोरीच्या चाव्यावरून महायुतीमध्ये घामासान सुरू होण्याची शक्यता आहे. निधीशिवाय कोणतीही कामे होत नाहीत-त्यामुळे मतं तुमचं निधी आमचा असेल कुर्डूवाडीच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही असे देखील रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) बोलताना म्हणाल्या.
अजित पवार, चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक चकमक; आता रुपाली चाकणकर मैदानात उतरल्या
माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे. त्यामुळं माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभा राहिलात, तर बारामतीसारखं काम तुमच्याकडे करु शकतो, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. नळदुर्ग नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजीत प्रचारसभेत अजित पवार बोलत होते. आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी बारामतीत केलेल्या वक्तव्यावरुनही चर्चा झाली. विरोधात उभा राहून निवडून आलेल्या उमेदवाराला नंतर निधी मिळाला नाही तर काय? असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं.
तर याच वक्तव्याचा धागा पकडत राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू दे, तिजोरीचा मालक आपल्याकडे आहे असं वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असंही ते म्हणाले. गडहिंग्लजमधील प्रचारसभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं होतं. याच स्पर्धेत आता रुपाली चाकणकर या देखील मैदानात उतरल्या असून त्यांनी या विषयावर भाष्य केलंय.
ही बातमी वाचा:























