Rohit Pawar On ED Investigation: 'केंद्रीय तपास यंत्रणांना मी आधीही सहकार्य केलं, आताही करेन', ईडी चौकशीवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Rohit Pawar On ED Investigation: राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला ईडीकडून (ED) सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
![Rohit Pawar On ED Investigation: 'केंद्रीय तपास यंत्रणांना मी आधीही सहकार्य केलं, आताही करेन', ईडी चौकशीवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया Rohit Pawar's first reaction to the ED investigation, 'I have cooperated with the central investigation agencies before, will do so now' Rohit Pawar On ED Investigation: 'केंद्रीय तपास यंत्रणांना मी आधीही सहकार्य केलं, आताही करेन', ईडी चौकशीवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/27/4adfdb9aeaedaac3a665a8077d56c1191661613456386384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rohit Pawar On ED Investigation: राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला ईडीकडून (ED) सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. यावरच आता रोहित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''मी दिवसभर सृजन भजन स्पर्धेच्या नियोजना होतो. मीडियाच्या माध्यमातून चौकशीचा मुद्दा कळला.'' ते म्हणाले, मी आधीही केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य केलं आहे. आताही करणार.''
'तपास यंत्रणांना आधीही सहकार्य केलं, आताही करेन'
ईडी चौकशीबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले आहेत की, ''जे सांगण्यात आलं आहे, ते कुणी सांगितलं? ती बातमी कोणी दिली? काय ती बातमी आहे? याबाबत काय कागद आहेत, हे मी पाहिलेलं नाही. हे मला बघावं लागेल आणि बघितल्यानंतर नक्कीच मी याबाबत बोलेल.'' ते म्हणाले की, ''जर मला बोलवलं, तर मी आधीही सहकार्य केलं आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेकवेळा केंद्रीय यंत्रणांनी मला माझ्या अधिकाऱ्यांना बोलावलं आहे. सत्तेत येण्याच्या पाच वर्ष आधीही देखील सीआयडी आणि इतर संस्थांनी माझी आणि माझ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. त्यावेळी जसं सहकार्य केलं, तसेच मी यावेळी ही करेन.''
काय आहे प्रकरण?
ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 2006 ते 2012 पर्यंत रोहित पवार (Rohit Pawar) हे या कंपनीचे संचालक होते. तसेच रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार (Rajendra Pawar) हे देखील 2006 ते 2009 पर्यंत या ग्रीन एकर कंपनीचे संचालक होते. या कंपनीत असणारे इतर सर्व सदस्य हे सध्या तुरुंगात आहेत. यातच एचडीआयएल कंपनीचे मालक राकेश वाधवान (Rakesh wadhwan) यांच्यासोबत इतर कंपन्यांमध्ये पार्टनर देखील आहेत. हाच धागा पकडून ईडीचा तपास सुरू आहे. ईडीने या संपूर्ण प्रकरणात रोहित पवार यांचे राकेश वाधवान यांच्या सोबतचे संबंध पाहता प्राथमिक तपासला सुरुवात केली आहे. ईडी आपल्या तपासात या कंपनीचा फॉरेन्सिक ऑडिट, शेअर धारक आणि संचालक यांची अर्थिक देवाण घेवाण याची बारकाईने तपास करणार आहे. ईडीला यात मनी लॉन्डरिंग तर झालं नाही ना, याचा तपास करायचा आहे.
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)