मुलगा पंकजला जबरदस्तीने विधानपरिषद ते पुतण्या समीरला अपक्ष उमेदवारी, भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवणारी 4 मोठी कारणे
Chhagan Bhujbal: राज्यभरातून भुजबळ समर्थक आपला रोष आणि नाराजी व्यक्त करत आहेत. आपल्या मतदारसंघात बैठका घेत आहेत.
Chhagan Bhujbal: राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर नाराज झालेले छगन भुजबळ यांनी 'जहा नही चैना वहा नही रहना' असं म्हणत उघडपणे नाराजीही व्यक्त केली. नाशिकमध्ये झालेल्या समता परिषदेच्या सभेमधून भुजबळांनी रस्त्यावरची लढाई सुरू करण्याचे ही संकेत देत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर तोफ डागली. मंत्रीपद द्यायचं नव्हतं तर मग निवडणुकीला उभं कशाला केलं असा सवालही त्यांनी अजित पवारांना केला. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आपल्यासाठी प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीस ही शेवटपर्यंत प्रयत्न करत होते असे सांगत मंत्रिपद नाकारण्यामागे अजित पवारच असल्याचे अप्रत्यक्ष संकेत त्यांनी दिले. गेल्या रविवारी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात 39 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात अनेक बडे आणि अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाल्याने राज्याच्या राजकारणात नाराजी नाट्य सुरू आहे. अनेकांनी हिवाळी अधिवेशनात जाणं हे टाळलं. एकीकडे मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेले छगन भुजबळ यांचं पुढचं पाऊल काय असणार या चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे भुजबळांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. दरम्यान छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याची कारण एबीपी माझाच्या हाती आली आहेत. जाणून घेऊयात..
राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. तर काही बड्या नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षांचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. त्यानंतर आता राज्यभरातून भुजबळ समर्थक आपला रोष आणि नाराजी व्यक्त करत आहेत. ते आपल्या मतदारसंघात बैठका घेत आहेत.
छगन भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याची कारणं
१) भुजबळ यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम केल्यामुळे पक्षातील लोक भुजबळ यांच्यावर नाराज होते.
२) भुजबळ यांनी बळजबरीने मुलासाठी (पंकज भुजबळ) विधानपरिषद आमदारकी पदरात पाडून घेतली. ती पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आवडली नाही.
३) समिर भुजबळ यांनी पक्षाविरूद्ध जाऊन अपक्ष उमेदवारी भरली. ती महायुती मधल्या मित्र पक्षांना खटकली.
४) नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारानी छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊ नका अशी अजित पवार यांच्याकडे विनंती केली. जर मंत्रिपद दिल तर नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार एकत्रित राजीनामा देतील अशी घोषणा केली.
हेही वाचा: