एक्स्प्लोर

Santosh Deshmukh PM Report: संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, चेहरा काळानिळा पडला, डोळेही जाळले

massajog sarpanch Santosh Deshmukh: संतोष देशमुख यांना प्रचंड मारहाण करण्यात आली होती. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप, पोलीस काय करणार कारवाई?

बीड: संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये देशमुख यांचा मृत्यू अतिरक्तस्रावाने झाल्याचे म्हटले आहे. आठ पानांचा हा अहवाल वाचल्यास संतोष देशमुख यांना किती छळ करुन भयंकर पद्धतीने मारण्यात आले, याची कल्पना येऊ शकते. आरोग्य विभागाने संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट सीआयडीकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबरला अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात विष्णू चाटे याच्यासह चौघांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. अद्याप तीन आरोपी फरार आहेत.  विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या जवळचा माणूस असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. भाजपचे आमदार सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा अंगावर काटा आणणारा तपशील विधानसभेत मांडला होता.

संतोष देशमुखच्या पोस्टमार्टेमध्ये नेमकं काय म्हटलंय?

संतोष देशमुख यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्या अंगावर विविध ठिकाणी मुका मार दिल्याने अतिरक्तस्राव झाला आहे. त्यामुळे ते शॉकमध्ये गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहवालात संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे कारण 'हॅमरेज अॅण्ड शॉक ड्यू टू मल्टिपल इन्जुरिज' असे नमूद करण्यात आले आहे. देशमुख यांच्या छाती, हात-पाय, चेहरा, डोके या भागात मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा-निळा पडला होता. त्यामुळे मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांचे डोळे जाळून टाकल्याची चर्चा आहे. 

आतापर्यंत कोणाकोणाला अटक?

संतोष देशमुख हत्याप्रकरणात आतापर्यंत जयराम चाटे, महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे यांना पोलिसांनी अटक केली आहे. विष्णू चाटेला पोलिसांनी बुधवारी बीड शहराजवळ ताब्यात घेतले होते. विष्णू चाटे हा वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता याप्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget