एक्स्प्लोर

वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये... संतोष देशमुख हत्याप्रकरणावर संदीप क्षीरसागरांच्या भाषणाने विधानसभा हलवून सोडली

Santosh Deshmukh murder case: वाल्मिक कराडचे फोन रेकॉर्ड तपासून बघा. वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीड जिल्ह्यात भीषण परिस्थिती उद्भवेल, तो केस तोडण्यात माहीर

नागपूर: संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याला अटक झाली नाही तर बीड जिल्ह्यात भीषण परिस्थिती उद्भवेल, असा इशारा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिला. त्यांनी गुरुवारी विधानसभेत संतोष देशमुख हत्याप्रकरणातील धक्कादायक तपशील सभागृहात मांडला. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड या व्यक्तीचा सहभाग आहे. मस्साजोग गावातील लोकांनी मला याबाबत माहिती दिली. 6 डिसेंबर, 9 डिसेंबर आणि 11 डिसेंबर या तीन दिवसांचे कॉल रेकॉर्ड पोलिसांनी तपासले तर पूर्ण गणित लक्षात येईल. संतोष देशमुख  यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस ठाणे जाळून टाकू, असे मस्साजोगचे गावकरी म्हणत होते. मात्र, मी त्यांना थांबवले. वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण होईल. जिल्ह्यातील लोक रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत. सरकारने वेळीच पावलं न उचलल्यास कायदा-सुव्यवस्था सांभाळणे अवघड होऊन जाईल, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले. 

बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येची जी घटना घडली. त्यामध्ये 6,9 आणि 11 डिसेंबर या महत्त्वाच्या तारखा आहेत. 6 तारखेला विंड मिलमध्ये भांडणं झाली. विंड मिल रॅकेटमुळे हा प्रकार घडला. 6 डिसेंबरला भांडणानंतर संतोष देशमुख आणि तिकडचा वॉचमन आणि विंडमिलचा अधिकारी शिंदे म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले होते. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही, केवळ एनसी घेतली. त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली. जेव्हा संतोष देशमुखला दोन गाड्या अडवून उचललं घेऊन गेले, तेव्हा त्यांच्यासोबत एक सहकारी होता. तो पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने सरपंचांचा जीव धोक्यात असल्याचे पोलिसांना सांगितले. तेव्हा पोलिसांनी काहीच केलं नाही. दोन-तीन तासांनी संतोष देशमुख यांचा मर्डर केल्यावर पोलीस कामाला लागले, असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला.

वाल्मिक कराडला अटक होणे गरजेचे: संदीप क्षीरसागर

वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख हत्याप्रकरणात अटक न केल्यास बीड जिल्ह्यात काय होईल, हे सांगता येत नाही. पोलिसांनी अधिवेशन संपण्यापूर्वीच वाल्मिक कराडला अटक केली पाहिजे. कारण हे लोक केस तोडण्यात माहीर आहेत, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले. 

बीड जिल्ह्यात 307 चा गुन्हा चॉकलेट खाल्ल्यासारखा दाखल होतो: संदीप क्षीरसागर

बीड जिल्ह्यात सध्याच्या घडीला वाळू, मटका आणि दारु अशा अवैध धंद्यांची भरमार आहे. जिल्ह्यात 307 चा गुन्हा चॉकलेट खाल्ल्यासारखा दाखल होतो. सरकारने ही परिस्थिती बदलण्यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत. बीड जिल्ह्यात मराठा आणि वंजारी हे दोन मोठे समजात आहेत. पण आज जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे की, दुकानदारांकडून साधी वस्तू विकत घेताना जात पाहिली जाते. एखादा अधिकारी जिल्ह्यात आला तर त्याच्या नावापेक्षा आडनाव पाहिले जाते. एखाद्या शाळेत मराठा समाजाची जास्त मुलं असतील तर वंजारी विद्यार्थ्याचे पालक त्या शाळेतून आपल्या मुलाचे अॅडमिशन काढून घेत आहेत, अशी सध्याची परिस्थिती आहे. माझ्या जातीच लोक जिल्ह्यात सुईच्या टोकावर मोजण्याइतके आहेत. तरीही बीडने मला दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी दिली आहे, असेही संदीप क्षीरसागर  यांनी म्हटले.

संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, चेहरा काळानिळा पडला, डोळेही जाळले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

व्हिडीओ

Mumbai Pune Express Way Traffic : पुणे-मुंबई वेवरील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? Special Report
Loksabha Drama : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळाचा कळस Special Report
Nashik Mayor : नाशिकमध्ये मिसळीवर ताव, सत्तेचा डाव Special Report
Ajit pawar NCP : 9 फेब्रुवारी... अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू होतं? Special Report
Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
Akola Accident News : अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मालेगावात सत्तास्थापनेत ट्विस्ट, एमआयएमच्या आमदाराने घेतली दादा भुसेंची भेट; शिवसेना पाठिंबा देणार?
मालेगावात सत्तास्थापनेत ट्विस्ट, एमआयएमच्या आमदाराने घेतली दादा भुसेंची भेट; शिवसेना पाठिंबा देणार?
Rahul Gandhi : प्रश्नांची इतकी भीती, मोदी जी सत्याला इतके घाबरले की असत्याचा आसरा घेतला : राहुल गांधी
प्रश्नांची इतकी भीती, मोदी जी सत्याला इतके घाबरले की असत्याचा आसरा घेतला : राहुल गांधी
Embed widget