एक्स्प्लोर

पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला

हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने तलाठ्याला जबर मारहाण करण्यात आली. तर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर महसूल पथकातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे पळत सुटले.

Jalgaon Crime:  अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या महसूल पथकावर 12 ते 15 वाळू माफियांनी अचानक हल्ला केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडली आहे. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चांदसर बु. गावातील गिरणा नदी पात्रात  घडली आहे.  हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने तलाठी दत्तात्रय पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली. तर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर महसूल पथकातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे पळत सुटले.यावेळी तलाठी दत्तात्रय पाटील हे हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने त्यांना फावड्याने ,लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. तलाठी दत्तात्रय पाटील यांच्या पायावर फावडे मारून पायाचे हाड मोडल्याने त्यांना जळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कंडारे हे घटनास्थळी पोहचले. दरम्यान, वाळू माफियांनी महसूल पथकावर केलेल्या हल्ल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे.

18 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री 2:15 धरणगाव येथील तहसील कार्यालयातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकाने चांदसर बु ता धरणगाव येथिल गिरणा नदी पात्रात वाळू वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर नायब तहसिलदार महसूल संदीप मोरे, मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत बाविस्कर, मंडळ अधिकारी प्रवीण बेंडाळे, तलाठी दत्तात्रय पाटील यांनी पकडले. घटनेची माहिती मिळताच ट्रॅक्टर चालक,मालक व वाळू भरणारे मजूर असे एकूण 12 ते 15 लोकांनी महसूलच्या पथकावर हल्ला चढवला.

नक्की घडले काय?

चांदसर बु. (ता. धरणगाव) येथील गिरणा नदीपात्रात मध्यरात्री महसूल पथकावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेने महसूल विभाग आणि परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यात तलाठी दत्तात्रय पाटील गंभीर जखमी झाले असून, त्यांना जळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पथकामध्ये नायब तहसीलदार संदीप मोरे, मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत बाविस्कर, मंडळ अधिकारी प्रवीण बेंडाळे, आणि तलाठी दत्तात्रय पाटील सहभागी होते.घटनेची माहिती मिळताच ट्रॅक्टर चालक, मालक आणि वाळू भरणारे मजूर असे 12 ते 15 जणांनी महसूल पथकावर अचानक हल्ला केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे महसूल पथकातील अधिकारी व कर्मचारी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात पळत सुटले. मात्र तलाठी दत्तात्रय पाटील हल्लेखोरांच्या तावडीत अडकले. तलाठ्याला फावड्याने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यांचे पायाचे हाड फावड्याने मारून जाणीवपूर्वक मोडण्यात आले. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कंडारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. महसूल पथकावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ माजली असून, प्रशासनाने हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी महसूल विभागाने रात्रगस्त सुरू केली आहे. 

हेही वाचा:

सायबर चोरट्यांचा धोका वाढला, नेमकी कशी होते फसवणूक? या घटनांपासून वाचण्यासाठी काय करावं?

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget