एक्स्प्लोर

Ravindra Dhangekar : एकनाथ शिंदे यांचं नेहमी पाठबळ मिळेल हा विश्वास, लढत राहील धंगेकर म्हणत रविंद्र धंगेकरांची नवी पोस्ट...

Ravindra Dhangekar : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुण्याचे महागनर प्रमुख रविंद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुण्याचे महागनगरप्रमुख माजी आमदार रविंद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. रविंद्र धंगेकर यांनी काही दिवसांपासून पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या व्यवहाराचा मुद्दा उचलून धरला आहे. धंगेकर यांनी या प्रकरणात पुण्याचे भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. धंगेकरांच्या या भूमिकेमुळं भाजप नेत्यांनी तक्रार केल्याच्या चर्चा सुरु आहेत. या दरम्यान रविंद्र धंगेकरांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये रविंद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या शिवसैनिकावर कारवाई केलेली नाही. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील, असं म्हटलं.  

Ravindra Dhangekar X Post : रविंद्र धंगेकर यांची एक्स पोस्ट

शिवसेना हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे.आदरणीय पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही.अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील, असा मला विश्वास आहे.

आणि पुन्हा एकदा सांगतो.....

 भगवान महावीरांचे मंदिर आणि जैन बोर्डींगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढविणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील. 

तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवी धंगेकर मागे हटणार नाही. 

सोबत आहेत पुणेकर, लढत राहील धंगेकर..!

रविंद्र धंगेकर यांचं सर्वपक्षीयांना आवाहन

रविंद्र धंगेकर यांनी दिवाळीनिमित्त शुभेच्छा देताना पुण्यातील सर्वपक्षीयांना आवाहन केलं आहे. समाजात कुठलीही चुकीची घटना घडत असताना जर ती आपल्या निदर्शनास आली तर एक जागृत पुणेकर म्हणून त्या घटनेवर व्यक्त व्हा, असं आवाहन रविंद्र धंगेकर यांनी केलं आहे.

रविंद्र धंगेकर यांच्याकडून घेण्यात येत असलेल्या भूमिकांबाबत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी धंगेकरांच्या बॉस सोबत बोलेन असं म्हटलं होतं. 

दरम्यान, रविंद्र धंगेकर यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर काही काळ रविंद्र धंगेकर यांच्याकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली नव्हती.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Maharashtra Local Body Election: नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
Embed widget