एक्स्प्लोर

Ravindra Chavan: मोठी बातमी! भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती

Ravindra Chavan: भाजपच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : भाजपच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा आज केली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीचे पत्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिध्दीस दिले आहे. प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती होईपर्यंत चव्हाण यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रदेश अध्यक्षांप्रमाणेच रविंद्र चव्हाण यांच्याकडे अधिकार राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे.  

रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते. डोंबिवलीतून ते चौथ्यांदा विजयी झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना संधी मिळाली नाही. तर दुसरीकडे आत्ताचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात महसूलमंत्रिपद मिळाले आहे, त्यानंतर आता रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

रविंद्र चव्हाण यांची राजकीय कारकिर्द

रविंद्र चव्हाण हे 2007 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

2007 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले.

2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले.

2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांनी शपथ घेतली.

2015-16 मध्ये कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल, महापालिकेत भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला. तसेच कर्जत, माथेरान, बदलापूरमध्ये भाजपने चांगले यश मिळवले. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते.

2019 मध्ये तिसऱ्यांदा आमदार झाले. 2021 मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

2021 मध्ये रविंद्र चव्हाणांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते होते. त्यांनी पालघर आणि सिंधूदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघरची जागा निवडून आणण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली

ठाकरेंचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोकणात विधानसभा निवडणुकीत सुरुंग लावण्यात रवींद्र चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका राहिली.

पालघरमध्ये ही बहुजन विकास आघाडीला धक्का देत भाजपाचे दोन आमदार आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा एक आमदार रविंद्र चव्हाण यांनी निवडून आणला.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते;  प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते; प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajiraje Speech Beed : हे छत्रपती घराणं बीडचं पालकत्व स्वीकारले, घणाघाती भाषणJitendra Awhad Speech: वाल्मिक रक्तपिपासू, नरभक्षक ;आकाचा बाप त्याला पहिलं मंत्रिमंडळातून हकला!ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 04 July 2023Navjot Singh Sidhu Speech Manmohan Singh : नवज्योतसिंग सिद्धूचं गाजलेलं भाषण पुन्हा व्हायरल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते;  प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते; प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
Bajrang Sonwane : धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
Embed widget