एक्स्प्लोर

ॲड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; तासभर चर्चेत मुख्यमंत्र्यांपुढे केल्या 'या' प्रमुख मागण्या

Prakash Ambedkar Meet CM Devendra Fadnavis : एकीकडे बीडमध्ये संतोष सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्व पक्षीय मोर्चा सुरु असताना दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेटी घेतलीय.

Prakash Ambedkar Meet CM Devendra Fadnavis मुंबई : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरण आणि परभणीतील हिंसाचारानंतर (Parbhani Violence) न्यायालयीन कोठडीत असलेले सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांच्या मृत्यू प्रकरणामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये (Beed) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी दाखल झाले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी परभणी घटनेच्या संदर्भात महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुबीयांना 1 कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशीही मागणी ॲड. आंबेडकर यांनी केली आहे.

ॲड. आंबेडकर यांनी केलेल्या काही प्रमुख मागण्या - 

1) परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी.

2) सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्या.

3) परभणीत पोलिसांनी क्रूरतेने केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करण्यासाठी आणि पुरेशी भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करा. 

4) 1 जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्यापूर्वी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि चुकीची माहिती भडकावण्याच्या कोणत्याही प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते हाणून पाडण्यासाठी पोलिसांना निर्देश द्यावेत.

5) आदिवासी विद्यार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना रद्द करा आणि पूर्वीची प्रणाली पुन्हा सुरू करावी.

दरम्यान, परभणीत पोलिसांनी क्रूरपणे केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करून त्यांना पुरेशी भरपाई देण्याची आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डीबीटी रद्द करण्यासाठी सल्लामसलत करण्यासाठी, सर्वेक्षण करण्याची आमची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी

सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे, सर्व आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, याप्रकरणामध्ये ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम व विधीतज्ज्ञ सतीश माणशिंदे यांची नियुक्ती व्हावी, हे प्रकरण बीड या ठिकाणी न चालवता मुंबई न्यायालायकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Parbhani Crime : वंशाच्या दिव्यासाठी पत्नीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, परभणीतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल

Anjali Damania : जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
SMAT : अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर रोमांचक विजय
अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर विजय
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Embed widget