एक्स्प्लोर

Maharashtra News : शेतकऱ्यांच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्याना मी सोडणार नाही; रविकांत तुपकर कडाडले, रोख नेमका कुणाकडे?

Maharashtra News : आपली लढत प्रतापराव जाधवांशी नसून प्रतापरावांची लढत आपल्याशी असल्याचं वक्तव्य रविकांत तुपकरांनी केलं आहे. तर आपल्याला जनतेतून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे विद्यमान खासदारांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, अशी टीका तुपकरांनी केली आहे.  

Maharashtra Buldhana Updates : बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana District) समृद्धी महामार्गाच (Samruddhi Mahamarg) बांधकाम सुरू असताना शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतजमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पात शेतजमिनी गेल्यात. याच शेतकऱ्यांच्या नावावर काही नेत्यांनी कोट्यावधी रुपये हडप केल्याचा आरोप शेतकरी नेते आणि बुलढाणा लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केला आहे. या प्रस्थापितांशी माझी लढत असून यात मी जिंकणार असल्याचं तुपकर म्हणाले आहेत. मात्र, यामुळे पुन्हा समृद्धी महामार्ग चर्चेत आला असून 'ते' प्रस्थापित कोण? याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

विद्यमान खासदारांच्या पायाखालची वाळू घसरली : रविकांत तुपकर 

आपली लढत प्रतापराव जाधवांशी नसून प्रतापरावांची लढत आपल्याशी असल्याचं वक्तव्य रविकांत तुपकरांनी केलं आहे. तर आपल्याला जनतेतून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे विद्यमान खासदारांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, अशी टीका तुपकरांनी केली आहे.  

बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी प्रतापराव जाधव यांच्यावर सडकून टीका केली आहे. परवा त्यांनी माझी लायकी काढली, आता त्यांची लायकी जनता काढणार आहे. मला मिळत असलेल्या जनतेतून प्रतिसादामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, ज्यामुळे ते आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या देतायेत. असा आरोप देखील तुपकर यांनी केला आहे. जाधवांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मोदींच्या चेहऱ्याची मदत न घेता माझ्यासारखं स्वतंत्र लढवून दाखवावं असं चॅलेंज देखील तुपकरांनी दिलं आहे. 

मी भाजपात जाणार ही केवळ अफवाच :  रविकांत तुपकर 

जनता हा आपला पक्ष, कुठेही तिकीट मागायला जावं लागलं नाही, गेल्या पाच वर्षांपासून आपण तयारी करतोय, त्यामुळे मी भाजपमध्ये जाणार ही अफवा आहे, रविकांत तुपकरांचं वक्तव्य केलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Embed widget