जे स्वतः स्टंटमॅन आहेत, त्यांनी सरकारने काय करायचं हे सांगायला नको, लाडकी बहीण योजनेवरुन अमृता फडणवीसांचे विरोधकांना खडे बोल
Amruta Fadnavis on Ladaki Bahin Yojana : गेल्या काही दिवसांपासून 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलयं. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करण्यात येईल, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय.
Amruta Fadnavis on Ladaki Bahin Yojana : गेल्या काही दिवसांपासून 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलयं. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करण्यात येईल, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी लाडकी बहीण योजनेवरुन (Ladaki Bahin Yojana) विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. त्या नागपूरमध्ये बोलत होत्या.
अमृता फडणवीस काय काय म्हणाल्या?
अमृता फडणवीस म्हणाल्या, लाडकी बहीण योजना ही बहिणींना रक्षाबंधनाची भेट आहे. महिलांच्या खात्यात पैसे येऊ लागले आहेत. त्यामुळे त्या बहिणी त्यांच्या छोट्या मोठ्या गरजा या माध्यमातून पूर्ण करू शकतील आणि आमची हीच इच्छा आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतर बंद होतील? या प्रश्नावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, जे स्वतः स्टंटमॅन आहे, त्यांनी हे नको सांगायला की सरकार ने काय करायला हवं. सरकार योग्य काम करत आहे. स्टंटमॅन लोकांनी हे सांगू नये.
मी नागपुरात नियमित येत राहते, नागपूर माझं माहेर आणि सासर आहे
पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, मी नागपुरात नियमित येत राहते. नागपूर माझं माहेर आणि सासर आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मी येत राहते. आज चांगला जनसंपर्क होत आहे याचा आनंद आहे. हो आज मी देवेंद्रजींच्या मतदारसंघात आहे. मात्र मी दुसरीकडे ही फिरत राहते.
रुग्णालयात जाऊन पुरावे नष्ट केले जात आहेत
कोलकातामध्ये जी बलात्काराची घटना घडली आहे, ती खूप भयावह आहे. असे अत्याचार झाल्यानंतर यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, ते न होता रुग्णालयात जाऊन पुरावे नष्ट केले जात आहेत. यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठलीच होऊ शकत नाही, असं मतंही अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं.
लाडकी बहीणचा 15 ऑगस्ट रोजी 48 लाख महिलांना लाभ
याआधी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस 14 ऑगस्ट रोजी 32 लाख महिलांना तर 15 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला. ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग 24 तास कार्यरत असून या प्रक्रियेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले होते. 31 जुलैपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या बँक खात्यावर सध्या 3000 रुपये जमा केले जाणार आहेत. नंतर हळूहळू सर्व महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जातील.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी 16 लाख लाडक्या बहिणींना सरकारचं गिफ्ट, खात्यावर आले 3000 रुपये, लगेच करा चेक!