Ramdas Athawale : मनसेचा विचार केला, मात्र आरपीआयचा नाही, रामदास आठवलेंनी खंत बोलून दाखवली
Ramdas Athawale on MNS : आरपीआयचे सर्वेसर्वा रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महायुतीकडे लोकसभेच्या 2 जागांची मागणी केली होती.
Ramdas Athawale on MNS : आरपीआयचे सर्वेसर्वा रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महायुतीकडे लोकसभेच्या 2 जागांची मागणी केली होती. शिवाय शिर्डीच्या जागेवरुन रामदास आठवले स्वत: निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, महायुतीतील इतर पक्षांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. मात्र, त्यांना इतर आश्वासन देण्यात आली आहेत. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा त्यांची खदखद बोलून दाखवली आहे. "मनसेचा विचार केला मात्र आरपीआयचा केला नाही",असं रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले. डोंबिवलीत राज्यस्तरीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल
रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, बच्चू कडू यांचे समजूत निघेल बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांचा वाद जुनाच आहे. बच्चू कडू यांचा अमरावती लोकसभेची जागा लढवण्याचा आग्रह अजिबात नाही. ते वर्ध्यामधून लढवणार आहेत. त्यांचे अनेक विषय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटवले आहेत. त्यांनी विषय मिटवावा मी देखील त्यांच्याशी बोलणार आहे. बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल.
इंडिया आघाडी फक्त अफवा पसरवण्याचे काम करत आहे
पुढे बोलताना रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, तरुणांनी माझ्यासोबत राहावे. मी योग्य दिशेने पुढे चाललो आहे. मी जरी बीजेपी सोबत असलो ही तरी अशा पद्धतीचे अलाईन्स असतात. एकट्याच्या ताकतीवर सत्तेवर येणे अशक्य असले तरी मित्र पक्षाच्या सहकार्याने आपण पुढे गेले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीमध्ये इंडिया आघाडी फक्त अफवा पसरवण्याचे काम करत आहे.
70 वर्षे सत्ता होती बाबासाहेबांच्या स्मारकांची काम पूर्ण केली नाहीत
समाजामध्ये भारत जोडो यात्रा काढण्याचे काम करत नाहीत तर तोडायचं काम करत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या हातामध्ये 70 वर्षे सत्ता होती, बाबासाहेबांच्या स्मारकांची काम पूर्ण केली नाहीत. तरुणांना माझे आव्हान आहे शॉर्टकट चा विचार न करता लॉन्ग टर्म चा विचार करणे आवश्यक आहे. विचारवंतांना सांगणे आहे की परिवर्तन होत असतं बीजेपीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले आहे. जी बीजेपी 1982 मध्ये दोन खासदारांची होती आज ती 303 खासदारांची बीजेपी झाली आहे, असेही रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या