एक्स्प्लोर

Nashik Loksabha : नाशिकमधून राजाभाऊ वाजे ठाकरे गटाचे उमेदवार, महायुतीचा उमेदवार कोण?

Shiv Sena UBT Candidate List : ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना नाशिकमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर दुसरीकडे महायुतीचा नाशिक लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT Candidates) पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाने नाशिक मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik Politics) जिल्ह्याला राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप कायम असताना ठाकरे गटाने आपला खंदा शिलेदार मैदानात उतरवला आहे.

नाशिकमधून राजाभाऊ वाजे ठाकरे गटाचे उमेदवार

बहुप्रतिक्षित अशी ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी अखेर जाहीर झाली आहे. ठाकरे गटाने मराठा आणि संयमी चेहरा राजाभाऊ वाजे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर दुसरीकडे महायुतीचा नाशिक लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गट लढणार असल्याचा निर्णय झाल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र, असं असलं तरी शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे लोकसभा निवडणुक लढण्यापासून माघार घेण्यास तयार नाहीत. हेमंत गोडसे यांनी नाशिक मतदारसंघावर दावा ठोकला आहे. 

महायुतीचा उमेदवार कोण?

यासोबतच छगन भुजबळ यांच्याकडूनही अजित पवारांवर दबाब वाढवण्यात येत असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. एकीकडे नाशिकची जागा महायुती अजित पवार गटाला सोडण्याचं नक्की झाल्यानंतरही शिंदे गटाचे हेंमंत गोडसे मागे हटायला तयार नाहीत. दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि छगन भुजबळ यांची नावे नावे चर्चेत आहेत. महायुतीत आधीच भाजप आणि शिंदे गटात नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरु आहे. त्यातच नाशिकमधून लोकसभेच्या तिकीटासाठी छगन भुजबळ यांच्याकडून दबाव वाढवण्यात येत असल्याची माहिती आहे.

राजाभाऊ वाजे यांना लोकसभेचं तिकीट

नाशिक लोकसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. राजाभाऊ वाजे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहे. ठाकरेंनी मराठा चेहऱ्यावर विश्वास दाखवला आहे. संयमी शांत नेता आणि मराठा चेहरा अशी राजाभाऊ वाजे यांची ओळख आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे पहिल्यांदा आमदार झाले होते.

राजाभाऊ वाजेंना संधी देण्यामागचं कारण काय?

राजाभाऊ वाजे हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. सिन्नर विधानसभा मतदारसंघातील दीड लाख मते राजाभाऊंकडे आहेत. यासोबतच इगतपुरी  ग्रामीण भागातील संपर्काचा विचार करून त्यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shiv Sena UBT Canditates: शिवसेना ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget