एक्स्प्लोर

Jayashree Patil: राज ठाकरे, तुमच्या खानदानाचा व्यवसाय काय होता, आम्ही कोहिनूर स्क्वेअरबद्दल बोललो तर तुमचं काय होईल; जयश्री पाटलांचा मनसेप्रमुखांवर हल्लाबोल

Jayashree Patil: डान्सबार ऑर्केस्ट्रा या संघटनेची मी वकील आहे, मी खात्रीने आणि अभ्यासपूर्ण सांगते, हे जे वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे हे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केले आहे.

मुंबई : शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन सोहळ्यामध्ये भाषण करताना  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील डान्सबारचा मुद्यावर भाष्य केलं होतं. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पनवेल (Panvel News) मधील लेडीज बारचा उल्लेख केला होता. छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक डान्सबार असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी भर सभेत खेद व्यक्त केला होता. दरम्यान, याच मुद्यावरून आता मनसैनिक आक्रमक झाले आहे. पनवेलमध्ये सुरु असलेल्या लेडीज बारमध्ये मनसेने तोडफोड करत मनसेचा 'खळ खट्याक' पद्धतीचा पवित्रा घेतला आहे. अशातच आता राज ठाकरे यांनी डान्स बार बाबत केलेल्या टिकेनंतर पनवेल मधील मनसे कार्यकर्त्यांनी कोनगाव (पनवेल ) मधील नाईट राईड डान्स बारची तोडफोड केली आहे. याबाबत आता वकिल सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटलांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या जयश्री?

डान्सबारला कधीच बंदी नव्हती. ते म्हणतात की हे डान्सबार अजून सुरूच कसे आणि त्यांनी अभ्यास केला तर कळेल. मॅक्सिमम डान्सबार आहेत ते मराठी लोकांचे आहेत, डान्सबार ऑर्केस्ट्रा या संघटनेची मी वकील आहे, मी खात्रीने आणि अभ्यासपूर्ण सांगते, हे जे वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे हे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केले आहे. कशासाठी हे सगळं राज ठाकरे करत आहेत. त्यांना काय वाटतं याच्यातून काय मिळणार आहे, काहीतरी चुकीचं करू नका ज्याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. 

शेवटी हा व्यवसाय आहे, काही ठरलेलं नाही इथे असू नयेत, इथे असावं, राज ठाकरे तुमच्या खानदानाचा व्यवसाय काय होता? ते मला सांगा बरं, तुम्ही जे शिवाजी पार्क जवळ राहायला गेला ते त्याचं गणित मला सांगा काय आहे? म्हणजे तुम्ही फारच असं मोठं काहीतरी करून गेले आहात असं काही आहे का? कोहिनूर स्क्वेअर बद्दल आम्ही अभ्यास करायला सुरुवात केली तर तुमचं काय होईल? तुम्ही लोकांचे डान्स बार मोजता, तुम्ही लोकांचे व्यवसाय मोजता, व्यवसाय जिथे चालतो तिथेच केला जातो, असंही त्या पुढे म्हणाल्या आहेत.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पनवेल (Panvel News) मधील लेडीज बारचा ही उल्लेख केला होता. छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक डान्सबार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
रामदास कदम म्हणाले सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, मनिषा तुपे प्रत्युत्तर देत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये...
रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये, मनिषा तुपेंचं सुनील तटकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
रामदास कदम म्हणाले सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, मनिषा तुपे प्रत्युत्तर देत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये...
रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये, मनिषा तुपेंचं सुनील तटकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश 
Video: लग्नातील लाखोंच्या खर्चाला फाटा दिला अन् दोघांनी मिळून त्याच खर्चात नवा फ्लॅट घेतला अन् त्याच फ्लॅटमध्ये मोजक्या लोकांमध्ये लग्नाची गाठ बांधली!
Video: लग्नातील लाखोंच्या खर्चाला फाटा दिला अन् दोघांनी मिळून त्याच खर्चात नवा फ्लॅट घेतला अन् त्याच फ्लॅटमध्ये मोजक्या लोकांमध्ये लग्नाची गाठ बांधली!
Embed widget