Raj Thackeray vs Maratha Protest : राज ठाकरे अन् मराठा आंदोलकातील वाद थांबता थांबेना,धाराशिवमध्ये प्रतिकात्मक पुतळा जाळला,पोलिसांची माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की
Raj Thackeray Vs Maratha Protester : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात असताना आरक्षणाबाबत टिप्पणी केल्यानंतर मराठा आंदोलक त्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागत होते.
Raj Thackeray Vs Maratha Protester : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात असताना आरक्षणाबाबत टिप्पणी केल्यानंतर मराठा आंदोलक त्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागत होते. मात्र, राज ठाकरे यांनी वेळ नाकारल्यानंतर मराठा आंदोलक थेट हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर राज ठाकरे स्वत: हॉटेल बाहेर आले. तुम्हाला भेटतो म्हणाले. मात्र, अद्याप धाराशिवमध्ये राज ठाकरे आणि मराठा समाजातील वादावर कोणताही तोडगा निघालेला नाही. पाच आंदोलकांना राज ठाकरेंच्या भेटीसाठी नेण्यासाठी पोलिसांची तयारी आहे. मात्र आंदोलक मीडियाला सोबत नेण्याची मागणीवर ठाम आहेत. यावेळी पोलिसांनी मीडियाच्या काही प्रतिनिधीना धक्काबुक्की देखील केली आहे.
जिल्ह्यातील ईट येथे राज ठाकरे यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांचा पुतळा केला दहन
धाराशिव शहरात राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल समोर मराठा बांधवाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. अशातच धाराशिवच्या भूम तालुक्यातील ईट गावात राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांच्या सह भाजपच्या विविध नेत्यांचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला
राज ठाकरे धाराशिवमधील पुष्पकपार्क या हॉटेलमध्ये मुक्कामाला आले आहेत. मराठा समाजाचे कार्यकर्ते अचानकपणे हॉटेलमध्ये शिरले आहेत. या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची रितसर वेळ मागितली होती. वेळ मागितल्यानंतर राज ठाकरेंनी वेळ नाकारली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हॉटेल परिसरात गोंधळ उडालेला आहे. मनसैनिक कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. राज ठाकरे काही वेळापूर्वी या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.
राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर
राज ठाकरेंच्या दौऱ्याला 4 ऑगस्ट पासून सुरवात झाली आहे. हा दौरा 13 ऑगस्ट पर्यंत हा दौरा सुरू असणार आहे. यामध्ये चार ऑगस्टला ते सोलापूर येथे होते सध्ये ते 5 ऑगस्ट रोजी धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. 6 ऑगस्ट ला ते लातूरला, तर सात ऑगस्टला ते नांदेडला, तर 8 ऑगस्टला ते हिंगोलीला, 9 ऑगस्ट ला ते परभणीला, 10 ऑगस्टला ते बीडला, 11 ऑगस्टला ते जालन्याला, 12 आणि 13 ऑगस्टला ते संभाजीनगरला असतील. या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे हे पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेतील तसेच निरीक्षकांनी ज्या मतदार संघाची चाचपणी केली आहे. त्या दृष्टीने चर्चा करणार आहेत. तसेच या बैठका आणि या दौऱ्या दरम्यान विविध ठिकाणी ते पत्रकारांशी व इतर संघटना प्रतिनिधी व नेत्यांशी देखील संवाद साधतील.
इतर महत्वाच्या बातम्या