एक्स्प्लोर

Raj Thackeray : राज ठाकरे मुक्कामी असलेल्या धाराशिवच्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले, जोरदार घोषणाबाजी

Raj Thackeray, धाराशिव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले आहेत. त्यांनी ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली आहे.

Raj Thackeray, धाराशिव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले आहेत. त्यांनी ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली आहे. राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये आंदोलकांनी ठिय्या मांडलाय. राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे, या दौऱ्यासाठी ते धाराशिवमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले आहेत. यावेळी मराठा आंदोलकांनी "मनोज जरांगे पाटील तुम्ही आगे बढो, हम तुम्हारे साथ है", अशी घोषणाबाजी देखील केली आहे. 

मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला

राज ठाकरे धाराशिवमधील पुष्पकपार्क या हॉटेलमध्ये मुक्कामाला आले आहेत. मराठा समाजाचे कार्यकर्ते अचानकपणे हॉटेलमध्ये शिरले आहेत. या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची रितसर वेळ मागितली होती. वेळ मागितल्यानंतर राज ठाकरेंनी वेळ नाकारली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हॉटेल परिसरात गोंधळ उडालेला आहे. मनसैनिक कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. राज ठाकरे काही वेळापूर्वी या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. 

राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर 

राज ठाकरेंच्या दौऱ्याला 4 ऑगस्ट पासून सुरवात झाली आहे. हा दौरा 13 ऑगस्ट पर्यंत हा दौरा सुरू असणार आहे. यामध्ये चार ऑगस्टला ते सोलापूर येथे होते सध्ये ते 5 ऑगस्ट रोजी धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. 6 ऑगस्ट ला ते लातूरला, तर सात ऑगस्टला ते नांदेडला, तर 8 ऑगस्टला ते हिंगोलीला, 9 ऑगस्ट ला ते परभणीला, 10 ऑगस्टला ते बीडला, 11 ऑगस्टला ते जालन्याला, 12 आणि 13 ऑगस्टला ते संभाजीनगरला असतील. या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे हे पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेतील तसेच निरीक्षकांनी ज्या मतदार संघाची चाचपणी केली आहे.  त्या दृष्टीने चर्चा करणार आहेत. तसेच या बैठका आणि या दौऱ्या दरम्यान विविध ठिकाणी ते पत्रकारांशी व इतर संघटना प्रतिनिधी व नेत्यांशी देखील संवाद साधतील.

इतर महत्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : सिंधुदुर्ग जंगलात सापडलेल्या महिलेची धक्कादायक कबुली, सर्वात मोठा गुंता जवळपास सुटला!

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Pratap Sarnaik on Eknath Shinde: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Embed widget