Raj Thackeray : 'राज ठाकरेंनी स्वत:चे वाटोळे केले', शिवतिर्थावरील मेळाव्यानंतर ठाकरे गटाची आगपाखड
Raj Thackeray MNS Gudi Padwa: स्वाभिमानाचा वारसा दिल्ली दरबारी गहाण ठेवून, दिल्लीश्वरांचे तळवे चाटणारे महाठग आज जन्माला आलेत, असे म्हणत ठाकरे गटाने राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
Raj Thackeray MNS Gudi Padwa: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना बिनशर्त पाठिंबा दिलाय. राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यात केवळ नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासाठी महायुतीत (Mahayuti) सहभागी होत असल्याचं जाहीर केलं.त्यानंतर राज ठाकरेंवर विरोधी पक्षातील नेत्यांनी राज ठाकरेंच्या भुमिकेवर टीका केला आहे. राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर करत स्वत:चे वाटोळे केले, अशी टीका शिवसेनेचे उपनेते आणि कोकणातले आमदार राजन साळवी यांनी केली आहे. तर मन माझं त्यात , मी नाही खात काय नाही त्यात ? असे म्हणत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने स्वाभिमानाचा वारसा दिल्ली दरबारी गहाण ठेवल्याचे म्हणत राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
आमच्या स्वाभिमानाचा वारसा दिल्ली दरबारी गहाण ठेवून, दिल्लीश्वरांचे तळवे चाटणारे महाठग आज जन्माला आलेत. त्या महाठगांना महाराष्टाचं पाणी पाजावंच लागणार!
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 9, 2024
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठाकरेंची मशाल!#ठाकरेंचीमशाल #ThackeraynchiMashal #mashal #uddhavthackeray pic.twitter.com/55DH2f6xRh
राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा देत पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. त्यांनी त्यांचं वाटोळं करून घेतलेले आहे अशा शब्दात शिवसेनेचे उपनेते आणि कोकणातले आमदार राजन साळवी यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केलेली आहे.
सुषमा अंधारेंनी एक चारोळी सोशल माध्यमांवर शेअर करत अगदी शेलक्या शब्दात राज ठाकरेंवर टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, मन माझं त्यात , मी नाही खात काय नाही त्यात ? तर गूळ नाही त्यात.
मन माझं त्यात , मी नाही खात
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) April 9, 2024
काय नाही त्यात ?
तर गूळ नाही त्यात...🤣#बिनशर्तपाठींबा
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समाधानकारक तोडगा निघाला नाही म्हणून पाठिंब्याचे ढोल आज शिवतीर्थावर वाजले, अशी टीका केली. समाधानकारक तोडगा निघाला नाही म्हणून पाठिंब्याचे ढोल आज शिवतीर्थावर वाजले. पाठिंबा द्यायचा होता तर दिल्लवारी करण्याची गरज काय पडली होती?, असा सवाल दानवेंनी या वेळी केला.
समाधानकारक तोडगा निघाला नाही म्हणून पाठिंब्याचे ढोल आज शिवतीर्थावर वाजले. पाठिंबा द्यायचा होता तर दिल्ली वारी करण्याची गरज काय पडली होती?#शिवतीर्थ #महाराष्ट्र #MaharashtraPolitics
— Ambadas Danve (@iambadasdanve) April 9, 2024
हे ही वाचा :