Raj Thackeray Gudi Melava 2024 Highlights राज ठाकरेंचा मोदींना बिनशर्त पाठिंबा ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जहरी टीका; वाचा मेळाव्यातील दहा ठळक मुद्दे
Raj Thackeray Gudi Melava 2024 Highlights: राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. तसेच ,महाराष्ट्रात चुकीचा कॅरम फुटला आहे अशा शब्दात पक्षफुटीवर हल्लाबोल केला. राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे पाहूयात..
Raj Thackeray Gudi Melava 2024 Heighligts: शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले. या भाषणामध्ये राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला आहे. तसेच अमित शाहांच्या भेटीत काय घडलं राज ठाकरेंनी भर सभेत सांगितलं आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे, संजय राऊत, अजित पवार, शरद पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. तसेच ,महाराष्ट्रात चुकीचा कॅरम फुटला आहे अशा शब्दात पक्षफुटीवर हल्लाबोल केला. राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे पाहूयात..
Raj Thackeray On PM Modi Support: माझा नरेंद्र मोदींसाठी भाजपाला बिनशर्त पाठिंबा: राज ठाकरे
2024 ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. मला वाटाघाटीमध्ये पाडू नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, अशी मोठी घोषणा राज ठाकरेंनी यावेळी केली.
Raj Thackeray On Vidhan Sabha: मनसैनिकांनी विधानसभेच्या तयारीला लागा : राज ठाकरे
देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे हे लक्षात घेऊन केवळ नरेंद्र मोदींसाठी आपण बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. आपल्या पक्षाला विधानपरिषद, राज्यसभा काहीही नको असं भाजप नेत्यांना सांगितल्याचं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना थेट विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले.
Raj Thackeray On Doctar Election Duty: डॉक्टर मतदारांची नस तपासणार आणि नर्स डायपर बदलणार का? : राज ठाकरे
डॉक्टर मतदारांची नस तपासणार आणि नर्स डायपर बदलणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. ज्या डॉक्टर, नर्सला निवडणुकांच्या ड्युटी लावल्या त्यांनी जाऊ नये, त्यांना कोण नोकरीवरून काढतो त्यांना मी बघतो, असा इशारा दिला.
Raj Thackeray On Alliance: पक्ष फोडून मला कोणतीही गोष्ट करणार नाही : राज ठाकरे
शिवसेनेचे प्रमुख व्हायचं असते तर आधीत झालो असतो. पक्ष फोडून मला कोणतीही गोष्ट करणार नाही. मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. मी फक्त शिवसेनाप्रमुखांच्या हाताखालीच काम केले. मी फक्त मनसेचा अध्यक्ष राहणार आहे.
Raj Thackeray On Amit Shah: राज ठाकरे आणि अमित शाहांच्या भेटीत काय झाले? : राज ठाकरे
अमित शहा यांच्या भेटीनंतर चक्र सुरु झाली. मात्र का गेलो तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले आपण एकत्र आले पाहिजे. देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले एकत्र आले पाहिजे. म्हणून अमित शाहांना फोन करुन म्हटलो एकत्र यायचे म्हणजे काय? यासाठी अमित शाहांना भेटायला दिल्लीला गेलो.
Raj Thackeray On BJP :शिवसेनेसोबत असताना सर्वाधिक संबंध भाजपवाल्यांसोबत : राज ठाकरे
मी ज्या घरात जन्मलो त्याच घरात शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनेसोबत असताना सर्वाधित संबंध भाजपवाल्यांसोबत आले.गडकरी, मुंडे, महाजन यांच्यासोबत माझे राजकारणापलीकडे संबंध आहे. काँग्रेससोबत भेठटी होत्या, पण गाठी भाजपवाल्यांसोबत पडल्या : राज ठाकरे
Raj Thackeray On PM Modi: विश्वास टाकला तर मी टोकाचे प्रेम करतो : राज ठाकरे
मोदी पंतप्रधान व्हावे हे मी सर्वात प्रथम मी बोललो. ज्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्या पटल्या नाहीत. मी एखाद्या गोष्टीवर टोकाचे प्रेम करतो. विरोध पण टोकाचा करतो. मी महाराष्ट्रावर टोकाचे प्रेम करतो. पाच वर्षात ज्या गोष्टी पटल्या त्याचे अभिनंदन केले. ज्या गोष्टी पटत नाही त्याचा टोकाचा विरोध केला. विश्वास टाकला तर मी टोकाचे प्रेम करतो. मला भूमिका पटली नाही, म्हणून मी विरोध करतो. स्वर्थासाठी कधीच विरोध केला नाही.
Raj Thackeray On Uddhav Thackeray: मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी टीका केली नाही : राज ठाकरे
मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी टीका केली नाही. मी व्यक्तिगत टीका कधीही हेली नाही. संजर राऊत, उद्धव ठाकरे जशी टीका करतात तशी टीका मी केली नाही. मला भूमिक पटली नाही म्हणून मी विरोध केला. त्यावेळी तुम्ही कुठे होता? त्यावेळी तुम्ही सत्तेचा मलीदा चाटत होते. तेव्हा राजीनामे का बाहेर आले नाही, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
Raj Thackeray On Youth: येणारी निवडणूक देशाचे भविष्य ठरवणारी : राज ठाकरे
देशात सर्वाधिक तरुण आपल्याकडे आहे. देशाचे तरुण हेच देशाचे भविष्य आहे.देशातील तरणांकडे मोदींनी लक्ष द्यावे. महाराष्ट्राला मोठा वाटा हवा, ही मोदींकडून अपेक्षा आहे. येणारी निवडणूक देशाचे भविष्य ठरवणारी आहे. महाराष्ट्रात चुकीचा कॅरम फुटला आहे. देशातील उद्योगपतींनी देश सोडून जाऊ नये, अशी अपेक्षा आहे.