Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
Raj Thackeray : देवेंद्र फडणवीसांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रिमंडळात आहेत, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.

Raj Thackeray : देवेंद्र फडणवीसांनीच (Devendra Fadnavis) भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रिमंडळात आहेत, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच राज्यातील नेत्यांवर आरोप झाल्यानंतर भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची राज ठाकरे यांनी कुंडलीच मांडली. मुंबईतील मनसेच्या मेळ्यातून राज ठाकरे बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, आम्ही डोक्यावर तलवारी घेऊन फिरत नाही. मोदी म्हणाले होते की, 70 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्याला आम्ही आत टाकू. त्यांनी आत कुठे तर मंत्रिमंडळात टाकले. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना मुख्यमंत्री, मंत्री बनवले. भाजपने मुकुल रॉयला पक्षात घेतले. बी एस येदुरप्पा यांना पक्षात घेऊन मुख्यमंत्री केले. काश्मीरमध्ये 370 कलमाला विरोध करणारे ओमर अब्दुल्ला आणि फारूक अब्दुल्ला यांनी भाजपसोबत युती केल्या. गेल्या 50-60 वर्षाचा इतिहास काय? कोणकोणत्या गोष्टी केल्या. मुफ्ती सईद आणि मेहबूब मुफ्ती यांच्याबरोबर देखील भाजपने युती केली, त्यांना मुख्यमंत्री केले आणि मग सरकार पाडले. राधाकृष्ण विखे पाटील हे सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते, मंत्री होते मग भाजपमध्ये गेले. हर्षवर्धन पाटील, नारायण राणे हे देखील भाजपमध्ये गेले. किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले.
मी भेटतो, पण विकला जात नाही
शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा प्रजासत्तासोबत युती केली, निवडणूक लढवली मुस्लिम लीग सोबत गेले. पण त्यावेळी परिस्थिती जशी होती तसे केले. त्यांनी केले तर प्रेम आम्ही केले तर बलात्कार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मी नरेंद्र मोदी यांच्या समोरच बोललो की, 2014 ला माझे बोलून झाले. देवेंद्र फडणवीस यांनी किती लोकांवर आरोप केले? भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, आता तेच त्यांच्या सोबत दिसतात. कित्येक लोक देव पाण्यात ठेवतात की आरोप व्हावे म्हणजे आत जाता येते. अनेक लोक बोलतात राज ठाकरे यांनी भाजपच्या लोकांना भेटायला नको. पण ते चहा प्यायला येतात, मी काय बोलू घरी पी? मी भेटतो पण विकला जात नाही. माझा मराठी बाणा तसाच आहे, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या























