Rahul Gandhi Sabha at Shivaji Park : ठाकरेंच्या होमग्राऊंडवर राहुल गांधींची सभा; 17 मार्चला शिवाजी पार्कवर भारत जोडो न्याय यात्रेचा भव्य समारोप
Mumbai News: शिवाजी पार्क मैदान आणि शिवसेना किंवा मग ठाकरे हे एक वेगळं नातं शिवसेना पक्ष स्थापनेपासून आहे. शिवाजी पार्क मैदान एकप्रकारे ठाकरेंच्या सभेसाठीचा एक होम ग्राउंड मानलं जातं. आता याच ठाकरेंच्या होम ग्राउंडवर गांधींची सभा होणार आहे.
Rahul Gandhi Sabha At Shivaji Park Mumbai : मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याया यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) महाराष्ट्रात (Maharashtra News) दाखल झाली असून येत्या 17 मार्चला या यात्रेचा समारोप होणार आहे. काँग्रेसच्या (Congress) भव्य यात्रेचा समारोप मुंबईत (Mumbai News) शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) भव्य सभेनं होणार आहे.
17 मार्च रोजी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या त्यांच्या सभेनं होणार आहे. खरंतर शिवाजी पार्क मैदान आणि शिवसेना (Shiv Sena) किंवा मग ठाकरे (Uddhav Thackeray) हे एक वेगळं नातं शिवसेना पक्ष स्थापनेपासून आहे. शिवाजी पार्क मैदान एकप्रकारे ठाकरेंच्या सभेसाठीचा एक होम ग्राउंड मानलं जातं. आता याच ठाकरेंच्या होम ग्राउंडवर गांधींची सभा होणार आहे. आणि या सभेसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आणि बड्या नेत्यांना काँग्रेसकडून निमंत्रण देण्यात आलं आहे.
मुंबईतील शिवाजी पार्कात राहुल गांधींची भव्य सभा
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला मुंबईत महाविकास आघाडीतील बडे नेते उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पार्क येथे 17 मार्च रोजी होणाऱ्या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपवेळी इंडिया आघाडीची एक मोठी सभा या निमित्तानं शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे.
यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना भारत जोडो यात्रेला उपस्थित राहण्यासाठी सोमवारी निमंत्रण देण्यात आलं आहे. शरद पवार यांना मंगळवारी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी निमंत्रण दिलं आहे. शिवाय महाविकास आघाडीतील सर्व महत्त्वाची नेत्यांनासुद्धा निमंत्रण काँग्रेसच्या वतीनं देण्यात येणार आहे. त्यामुळे एक प्रकारे मोठे शक्ती प्रदर्शन लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडी कडून या निमित्ताने केला जाईल.
शरद पवार 17 मार्च रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथे होणाऱ्या सभेला उपस्थित राहणार आहे. तसेच, 16 मार्च रोजी यात्रा चैत्यभूमी इथे पोहचणार आहे, तिथे देखील शरद पवार उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे हे 17 मार्च शिवाजी पार्क होणाऱ्या सभेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळे, मालेगावात दाखल होणार; 17 मार्चला मुंबईत भव्य समारोप