राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळे, मालेगावात दाखल होणार; 17 मार्चला मुंबईत भव्य समारोप
Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला नंदुरबारमधून सुरुवात, आज धुळे आणि मालेगावात राहुल गांधींची यात्रा दाखल होणार, तर 17 मार्चला मुंबईतल्या शिवाजी पार्कात यात्रेचा समारोप.
Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra At Maharashtra : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) आज महाराष्ट्रात (Maharashtra News) दाखल झाली आहे. आज महाराष्ट्रातील या यात्रेचा दुसरा दिवस आहे. मंगळवारी ही यात्रा नंदुरबारमध्ये (Nandurbar News) दाखल झाली, तर आज धुळे (Dhule News) आणि मालेगावचा (Malegaon) टप्पा पार करणार आहे. मालेगावत दुपारी 3 वाजता राहुल गांधी यांचा रोड शो होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात चौक सभा देखील पार पडणार आहे. त्यानंतर राहुल मालेगावजवळच्या सौंदाणे गावात जातील आणि तिथं मुक्काम करतील.
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला 14 मार्च रोजी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात यात्रा दाखल झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी शरद पवार राहुल गांधींना भेटणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर शरद पवार आणि राहुल गांधी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान, येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. अशातच राहुल गांधीची न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आणि त्यातच राहुल गांधींच्या भारत जोडो न्याया यात्रेचा महाराष्ट्रात होणारा समोरोप ही मोठा राजकीय घडामोड असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.
मुंबईतील शिवाजी पार्कवर भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत आल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थिती लावणार आहेत. तसेच, मुंबईत भारत जोडो न्याय यात्रेचा भव्य सभेनं समारोप होणार आहे. राहुल गांधींची मुंबईतील शिवाजी पार्क येथे भव्य सभा पार पडणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे 17 मार्च रोजी होणाऱ्या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाजी राज्यभरातील काँग्रेस नेतेही उपस्थित असतील.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपवेळी इंडिया आघाडीची एक मोठी सभा या निमित्तानं शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना भारत जोडो न्याय यात्रेला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. शिवाय महाविकास आघाडीतील सर्व महत्त्वाच्या नेत्यांनासुद्धा निमंत्रण काँग्रेसच्या वतीनं देण्यात येणार आहे. त्यामुळे एक प्रकारे मोठं शक्तीप्रदर्शन लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीकडून या निमित्तानं केलं जाणार आहे.