Rahul Gandhi on Twitter: राहुल गांधींकडून पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचे अभिनंदन; जाणून घ्या काय म्हणाले?
Punjab New CM: चरणजीत सिंह चन्नी अमरिंदर सिंग सरकारमध्ये तंत्रशिक्षण आणि पर्यटन मंत्री होते. ते चमकौर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे.
Rahul Gandhi Congratulates Punjab New CM: चरणजीत सिंह चन्नी यांचे पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी त्यांचे अभिनंदन केले. पंजाब काँग्रेस विधिमंडळ पक्षाने चरणजित चन्नी यांची पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकमताने निवड केली आहे.
राहुल गांधी यांनी त्यांचे अभिनंदन करताना ट्विट केले, की "श्री. चरणजीत सिंह चन्नी जी यांना नवीन जबाबदारीबद्दल अभिनंदन. आपल्याला पंजाबच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करत राहिले पाहिजे. त्यांचा विश्वास सर्वांपेक्षा जास्त आहे."
कोण आहे चरणजीत सिंग चन्नी?
चरणजीत सिंह चन्नी अमरिंदर सिंग सरकारमध्ये तंत्रशिक्षण आणि पर्यटन मंत्री होते. चमकौर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत. ते पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत.
Congratulations to Shri Charanjit Singh Channi Ji for the new responsibility.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 19, 2021
We must continue to fulfill the promises made to the people of Punjab. Their trust is of paramount importance.
चरणजीत सिंह चन्नी मुख्यमंत्री झाल्याबद्दल कॅप्टन यांच्याकडून अभिनंदन
कॅप्टन अमरिंदर सिंग (ज्यांनी काल पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला) यांनी भावी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट केले, की आशा आहे की, ते सीमावर्ती पंजाब राज्य सुरक्षित ठेवण्यात आणि लोकांना सीमेपलीकडून वाढत्या सुरक्षेच्या धोक्यापासून वाचवू शकतील.
काँग्रेसने दिला संदेश
काँग्रेसच्या या निर्णयाला पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांशी जोडून पाहिले जात आहे. राज्यात दलित लोकसंख्या तीस टक्क्यांहून अधिक आहे. त्याचबरोबर काँग्रेसने चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवून पक्षातील वरिष्ठ नेत्यांमधील मतभेद संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
उद्या सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांचा शपथविधी
मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर चरणजीत सिंह चन्नी यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा प्रस्ताव मांडला. यावेळी नवज्योतसिंग सिद्धू त्यांच्यासोबत उपस्थित होते. आता उद्या सकाळी 11 वाजता चरणजित चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.