(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prithviraj Chavan on Shivsena : मोदी म्हणजे दुसरे पुतीन, शिंदे गट कमळात मर्ज करण्याचा प्रयत्न होईल, पृथ्वीराज चव्हाणांनी जखमेवर मीठ चोळलं
Prithviraj Chavan on Shivsena : भाजपच्या 250 च्या खाली जागा आल्या तर मोदी सरकार येणार नाही. तोडमोड करुन सरकार आणण्याचा प्रयत्न केला जाईल.
Prithviraj Chavan on Shivsena : "भाजपच्या 250 च्या खाली जागा आल्या तर मोदी सरकार येणार नाही. तोडमोड करुन सरकार आणण्याचा प्रयत्न केला जाईल. मोदी हे व्यक्तीमत्व हे पुतीन सारख आहे, त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे. इंदिरा गांधींच्या आणिबाणीचे आम्ही समर्थन करत नाहीत. मात्र, तो संविधानात हक्क आहे," असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. ते एबीपी माझाशी बोलत होते.
पण कार्यकर्ते चार्ज झाले हे खर आहे
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, एकीकडे एकनाथ शिंदे यांची महायुतीमध्ये जागा वाढवून मिळवण्याची धडपड सुरु असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याच्यावर मीठ चोळलय. शिंदे गट कमळात मर्ज करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. भाजपने जे विभाजन केलं त्याच्या विरोधात राहुल गांधी याची ना भुतो ना भविष्य अशी यात्रा झाली. या यात्रेची वेळ चुकली हे मान्य आहे. पण कार्यकर्ते चार्ज झाले हे खर आहे. थेट फायदा किती होईल हा माहीत नाही कारण राहुल गांधी स्वता सांगतात की,मी राजकीय यात्रा काढली नाही, असंही पृथ्वीराज चव्हाम यांनी स्पष्ट केलं.
पुढे बोलताना पृ्थ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीवर महाराष्ट्राचे राजकारण अवलंबून आहे. शिवसेना शिंदे गट कमळात मर्ज होण्याचा प्रयत्न होईल. नैसर्गिक प्रयत्न होईल. उद्धव ठाकरे म्हणतात हे सर्व गद्दार आहेत ते जर पडले तर त्यांचा पक्ष कसा राहिल? असंही चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी नमूद केलं.
संजय निरुपम यांचा शिवसेनेला पहिल्यापासून विरोध होता
उद्दिष्ट गाठण्यासाठी नेत्यांनी समजूतदारपणा घेतला पाहिजे. पवार साहेबांचा मोठा पक्ष असताना त्यांनी फक्त 10 जागा मागितल्या. संजय निरुपम यांचा शिवसेनेला पहिल्यापासून विरोध होता. आघाडी करु नका अशी त्यांची भुमिका होती. त्यामुळे नैराश्यातून ते बोलत आहेत. दोन पक्षात मोठी फुट पडली,मात्र काँग्रेसमध्ये अशी फुट नाही पडली. काही लोक स्वार्थासाठी सोडून गेले त्यामुळे काँग्रेस मध्ये तसं होणार नाही, असा आरोपही चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला.
पाच वर्ष जुनी भाषण काढली तर ती काय होती?
70 टक्के लोक संस्थांच्या भितीमुळे भाजपमध्ये जात आहेत. पाच वर्ष जुनी भाषण काढली तर ती काय होती? ईडीने दरवाजा ठोठावला म्हणून तुम्ही गेलात. मोदी कमी मताने निवडून येतात.मात्र विरोधकांमध्ये फुट पाडतात त्यामुळे ते निवडून येतात. इंडिया आघाडी केली, मात्र पाहिजे तेवढं जमल नाही. भाजपला हरवायच असेल तर ऐकास एक उमेदवार दिला नाही पाहिजे, असेही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या