Prakash Ambedkar on Congress : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटली, प्रकाश आंबेडकरांनी तोफ डागली, हल्लाबोल करत म्हणाले...
Prakash Ambedkar on Congress, Mumbai : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारलीये. महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपच्या 5, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 2 उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली आहे.
Prakash Ambedkar on Congress, Mumbai : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारलीये. महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपच्या 5, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 2 उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली आहे. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. कारण काँग्रेसची ८ मतं फुटली आहेत. शिवाय ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना महायुतीतील पक्षांची मतं फोडण्यात अपयश आले आहे. दरम्यान, निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) हल्लाबोल केलाय. प्रकाश आंबेडकरांनी ट्वीट करत काँग्रेसवर टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर काय काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या किमान 8 आमदारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला क्रॉस व्होटींग केले. काँग्रेसने दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसींना मुर्ख बनवले आणि त्यांचा वापर केला. तरीही हे लोक संविधान वाचवणार आहेत असे तुम्हाला वाटते? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
कोणत्या पक्षाचे आणि कोणते उमेदवार विजयी?
भाजपचे विजयी उमदेवार
1) योगेश टिळेकर - 26 मते
2) पंकजा मुंडे - 26 मते
3) परिणय फुके- 26 मते
4) अमित गोरखे - 26 मते
5) सदाभाऊ खोत - 24
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार
1) भावना गवळी -
2) कृपाल तुमाने
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
1. शिवाजीराव गर्जे
2. राजेश विटेकर
काँग्रेस विजयी उमेदवार
1) प्रज्ञा सातव - 26
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
1.) मिलिंद नार्वेकर
काँग्रेसकडून आमदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न नाही
विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर आपल्या आमदारांची मतं फुटू नयेत, यासाठी प्रत्येक पक्ष काळजी घेत होता. अजित पवारांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले नव्हते.
Congress’ at least 8 MLAs cross-voted for BJP-led Mahayuti in the Maharashtra MLC elections.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 12, 2024
BJP = Congress
Congress fooled and used Dalits, Adivasis, Muslims and OBCs.
आपको अभी भी लगता है कि ये लोग संविधान बचाने वाले हैं? pic.twitter.com/qJmWBnRwfr
इतर महत्वाच्या बातम्या