प्राजक्ता माळी यावर बोलणार नाही, कल्याण-बदलापूर घटनेवर फिल्म इंडस्ट्रीतलं कोणीच बोललं नाही; वडेड्डीवार संतापले
आम्ही कुणाला सोडणार नाही, पण आम्ही कोणाला पकडणार देखील नाही, असे म्हणत काँग्रेस नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबई : बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडावरुन राज्यभर संताप व्यक्त होत असताना राजकीय नेत्यांनी देखील हे प्रकरण हाती घेतलं आहे. राज्य सरकारची भूमिका संशयास्पद असून आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्याची पाठराखण केली जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून होत आहे. त्यातच, आमदार सुरेश धस यांनी परळीचा सांस्कृतिक पॅटर्न म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळीचं (Prajakta mali) नाव घेतल्यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. कारण, प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन महिलांना बदनाम केलं जात असल्याचं म्हटलंय. आता, याप्रकरणी काँग्रेस नेते व आमदार विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला लक्ष्य केलं. तसेच, बीडप्रकरणी वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करावी आणि धनंजय मुंडेंचा (Dhananjay munde) तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी, प्राजक्ता माळी यांनीही ह्या हत्याकांड प्रकरणावर बोललं पाहिजे, सिनेकलाकार अशा घटनांवर बोलत नाही. कल्याणच्या घटनेवर, बदलापूरच्या घटनेवर कोणी बोलताना दिसलं नाही, असे म्हणत सिनेकलाकारांकडे बोट दाखवलं आहे.
आम्ही कुणाला सोडणार नाही, पण आम्ही कोणाला पकडणार देखील नाही, असे म्हणत काँग्रेस नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, फरार आरोपींची संपत्ती जप्त केली जात आहे, पण हा दिखावापणा आहे कारण ती संपत्ती अवैध मार्गानेच कमावलेली आहे. ज्या गतीने कारवाई व्हायला पाहिजे, त्या गतीने कारवाई होत नाही, याउलट हे प्रकरण दाबलं जात आहे. त्यामुळे, आम्ही सीबीआयच्या चौकशीची मागणी करत असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटलं.
सिनेकलाकार अशा घटनांवर बोलत नाही
संतोष देशमुख यांचं कुटूंब अजूनही रडतंय, महिलांच्या शोषणाच्याही अनेक घटना बीडमध्ये घडल्या आहेत. सरकारने या संदर्भात सीबीआय चौकशी केली पाहिजे. आकाच्या वर बाका आहे, ते हे सर्व वाचवतोय. स्पेशल टीम लावली नाही, तुम्ही आरोपी शोधत नाही. मालमत्ता जप्त करत आहेत, पण त्या खंडणी गोळा करुन जमा केलेल्या आहेत, असे म्हणत पोलीस कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. तसेच, अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेवरही वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली. प्राजक्ता माळी बीड हत्याप्रकरणावर बोलणार नाही. फिल्म इंडस्ट्रीतील कोणी यावर बोलत नाही, असे म्हणत सिनेकलाकारांनाच वडेट्टीवारांनी धारेवर धरलं आहे. प्राजक्ता माळी यांनीही ह्या हत्याकांड प्रकरणावर बोललं पाहिजे, सिनेकलाकार अशा घटनांवर बोलत नाही. कल्याणच्या घटनेवर, बदलापूरच्या घटनेवर कोणी बोलताना दिसलं नाही, असे म्हणत सिनेकलाकारांकडे बोट दाखवलं आहे. तसेच, हे प्रकरण पुढे करुन बीडची घटना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असेही ते म्हणाले.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या
आघाडी आणि युती सरकारमधील फरक आहे. हे महाराष्ट्र विकून काढतील तरी कारवाई होणार नाही. चौकशीचे फार्स होईल, चित्रा वाघ बोलल्या होत्या पूजा चव्हाणचा मृत्यू झाला, आम्ही संजय राठोडवर कारवाई केली होती. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला होता. आता कारवाई करत नाही, आता परवानगी असेल तर 10 बायका करा, कुणाचा खून करू नका, असे म्हणत वडेट्टीवार यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सुरेश धस यांनाही टोला
धनंजय मुंडे म्हणतात चौकशी करा. पण, कुणाचे कुणाशी सबंध आहेत? वाल्मीक कराडला शोधून आणा, त्याची नार्को टेस्ट करा. तो खुनाच्या गुन्ह्यात दिसेल, अनेक मुलींचे शोषण झाले आहे,ते शोधलं पाहिजे. सुरेश धस 7/12 काढा, केवळ
बोट दाखवू नका, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी आमदार सुरेश धस यांनाही याप्रकरणी खोलात जाण्याचं सूचवलं आहे.
हेही वाचा
बीड हत्याकांडातील 3 फरार आरोपींची हत्या, दमानियांचा दावा; आता, बीड पोलिसांकडून मोठा खुलासा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
