Nagpur: जिल्हा परिषदेच्या कामांमध्ये हस्तक्षेप करत भाजपकडून दुजाभावाचे राजकारण; सलील देशमुख यांच्या नेतृत्त्वात नागपुरात तीव्र आंदोलन
Maharashtra Politics : नागपूर जिल्हा परिषदच्या आवारात आज (28 जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात आले.
Nagpur: नागपूर जिल्हा परिषदच्या आवारात आज (28 जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विकास कांमाच्या वर्क ऑर्डर भाजपच्या नेतृत्वातील राज्य सरकारने थांबविल्याचे आरोप करत हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. भाजप राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या कामांमध्ये हस्तक्षेप करून राजकारण करत आहे. यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला विकास निधी आणि आवश्यक कामांपासून वंचित करत आहे, असा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांच्या नेतृत्त्वात नागपुरात तीव्र आंदोलन सध्या करण्यात येतंय/
राज्य सरकार कडून दुजाभावाचे राजकारण- सलील देशमुख
जनतेने निवडून दिलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांचे काम होत होते. मात्र यांनी हस्तक्षेप करून त्या कामात अडथळे निर्माण केले. राज्य सरकार येऊन दोन महिने होऊन ही कामे मंजूर होत नाही. या जिल्ह्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री आहे, तरी नागपूर जिल्हा परिषद संदर्भात राज्य सरकार कडून दुजाभाव केला जात आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना असा भेदभाव केला जात नव्हता. मात्र भाजप सत्तेवर येऊन आपले रंग दाखवत आहे. जनतेची काम जाणून-बुजून मुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री थांबवत आहे, असा आमचा आरोप असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांनी दिली आहे.
याद राखा! सत्ता येते जाते, पण...
आमचे आंदोलन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाही. ज्या कामासाठी आम्ही हट्ट धरत आहोत त्या कामांच्या निविदांची तारीख आणि वर्क ऑर्डरची तारीख तुम्ही पाहून घ्या. याद राखा सत्ता येते जाते, आज पदावर असलेले पुढे माजी मंत्री होतील. विकास कामे जनतेची आहे, ती होत राहिली पाहिजे.जी कामे आम्ही प्रस्तावित केली आहे, त्यांची वर्कऑर्डर लवकरात लवकर काढा आणि कामे सुरू करा अशी आमची मागणी असल्याचे ही सलील देशमुख म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या