एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस कार्यालयाबाहेर तोडफोड प्रकरणी मोठी कारवाई; सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसाचे निलंबन

Devendra Fadnavis: मंत्रालयातील सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसाचे निलंबन करण्यात आले. 

Devendra Fadnavis Mantralaya Incident: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील (Mumbai Mantralaya) कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी समोर आली आहे. मंत्रालयात तगडी सुरक्षाव्यवस्था असतानाही ही महिला देवेंद्र  फडणवीस यांच्या कार्यालयापर्यंत पोहचल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. सदर प्रकरणानंतर पोलिसांची चौकशी करण्यात आली आणि मंत्रालयातील सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसाचे निलंबन करण्यात आले. 

दादरमध्ये राहणाऱ्या महिलेने मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयाबाहेर गुरुवारी तोडफोड केली होती. प्राथमिक चौकशीत सचिव प्रवेशद्वारावर तिला अडवण्यात आले नाही अथवा तिची चौकशी करण्यात आली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावर तैनात पोलीस हवालदार अनिल धनंजय आवळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बेशिस्त व बेजबाबदारीचा ठपका-

मंत्रालयासारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणी प्रवेशिकेशिवाय महिला पोहोचल्यामुळे याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. बेशिस्त व बेजबाबदारीचा ठपका ठेवून पोलीस हवालदार अनिल धनंजय आवळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणारी महिला कोण?

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या या महिलेचं नाव धनश्री सहस्त्रबुद्धे आहे. तोडफोड करणारी महिला मानसिक रुग्ण आहे. सदर महिला दादरमधील एका सोसायटीतील राहिवासी आहे. सदर महिला घरी एकटीच राहते. सदर महिलेच्या आईवडिलांचं निधन झालं असून बहिणीचं लग्न झालं आहे. सदर महिलेने याआधी भाजपच्या कार्यालयात देखील गोंधळ घातला होता. सदर महिलेचं राहत्या सोसायटीमध्ये देखील अनेकवेळा भांडणं झाली आहेत. अनेकवेळा सोसायटीमध्ये चाकू घेऊन फिरताना देखील दिसून आली. घराच्या शेजाऱ्यांच्या दरवाजावर झाडून मारताना देखील सदर महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. याआधी सदर महिला अनेकवेळा मंत्रालयात आली असल्याची माहिती बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा नंबर द्या...लग्न करायचं आहे, अशी तिची मागणी अनेक राजकीय नेत्यांना फोन करुन सलमान खानचा नंबर मागते. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सदर महिलेचे काय म्हणणं होते तिने कशा करता हे केले ते आम्ही निश्चितपणे समजून घेऊ. एखाद्या उद्विग्नतेने तीने हे केले आहे का? तिची काय व्यथा आहे? हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ आणि ती व्यथा दूर करण्यास आम्ही प्रयत्न करू. महिलेला कुणी पाठवले याची माहिती घेणार आहे, असे त्यांनी म्हटले. 

संबंधित व्हिडीओ:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devenra Fadnavis In Nagpur: मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच स्वगृही, स्वागतासाठी नागपूरकरांची 'देव दिवाळी'  
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच स्वगृही, स्वागतासाठी नागपूरकरांची 'देव दिवाळी'  
Maharashtra Temperature Update: गोंदियात आज 6.9अंश! उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी, विदर्भातही बोचरी थंडी, तुमच्या जिल्ह्यात किती तापमान? वाचा सविस्तर
गोंदियात आज 6.9अंश! उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी, विदर्भातही बोचरी थंडी, तुमच्या जिल्ह्यात किती तापमान? वाचा सविस्तर
अहिल्यानगरचा 'किम जोंग उन' झळकला हिंदी टेलिव्हिजनवर, गीता माँसोबत मराठी संवाद, महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता आहे तरी कोण?
अहिल्यानगरचा 'किम जोंग उन' झळकला हिंदी टेलिव्हिजनवर, गीता माँसोबत मराठी संवाद, महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता आहे तरी कोण?
Buldhana Accident: भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक, 3 तरुण जागीच ठार, बुलढाण्यात भीषण अपघात
भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक, 3 तरुण जागीच ठार, बुलढाण्यात भीषण अपघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kishore Tiwari On Sanjay Rathod :भ्रष्टाचारी आणि स्त्रीलंपट आमदाराला मंत्रिपद देऊ नका : किशोर तिवारीMaharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळाचा उद्या दुपारी तीननंतर नागपुरात होणार शपथविधीAllu Arjun : अल्लू अर्जुनची जेलमधून सुटका,जामीन मिळाल्यानंतर रात्रभर जेलमध्येच होता मुक्कामABP Majha Headlines : 7 AM : 14 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devenra Fadnavis In Nagpur: मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच स्वगृही, स्वागतासाठी नागपूरकरांची 'देव दिवाळी'  
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच स्वगृही, स्वागतासाठी नागपूरकरांची 'देव दिवाळी'  
Maharashtra Temperature Update: गोंदियात आज 6.9अंश! उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी, विदर्भातही बोचरी थंडी, तुमच्या जिल्ह्यात किती तापमान? वाचा सविस्तर
गोंदियात आज 6.9अंश! उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी, विदर्भातही बोचरी थंडी, तुमच्या जिल्ह्यात किती तापमान? वाचा सविस्तर
अहिल्यानगरचा 'किम जोंग उन' झळकला हिंदी टेलिव्हिजनवर, गीता माँसोबत मराठी संवाद, महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता आहे तरी कोण?
अहिल्यानगरचा 'किम जोंग उन' झळकला हिंदी टेलिव्हिजनवर, गीता माँसोबत मराठी संवाद, महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता आहे तरी कोण?
Buldhana Accident: भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक, 3 तरुण जागीच ठार, बुलढाण्यात भीषण अपघात
भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक, 3 तरुण जागीच ठार, बुलढाण्यात भीषण अपघात
Hingoli News: शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना भर थंडीत झोपवलं जमिनीवर; आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना भर थंडीत झोपवलं जमिनीवर; आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Winter Travel: डिसेंबरमध्ये सर्वात कमी गर्दी असलेली 'ही' हिल स्टेशन्स, जिथे बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद घेता येईल, एकदा जाणून घ्याच..
डिसेंबरमध्ये सर्वात कमी गर्दी असलेली 'ही' हिल स्टेशन्स, जिथे बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद घेता येईल, एकदा जाणून घ्याच..
Nanded: 'आता तुला फक्त उचललंय, राजकीय नेत्यावर बोलशील तर..' ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाच्या अपहरणाबाबत धक्कादायक अपडेट
'आता तुला फक्त उचललंय, राजकीय नेत्यावर बोलशील तर..' ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाच्या अपहरणाबाबत धक्कादायक अपडेट
मस्साजोग हत्याकांडानंतर पवनचक्की प्रकल्पांवर CCTV ची नजर, धाराशिव पोलीस अलर्टमोडवर! दिल्या 'या' सूचना
मस्साजोग हत्याकांडानंतर प्रशासन अलर्ट मोडवर, पवनचक्की प्रकल्पांवर बसणार CCTV ची नजर, पोलिसांच्या 'या' सूचना
Embed widget