PM Modi Security Breach:सुरक्षेत झालेल्या चुकीनंतर पंतप्रधान मोदींची राष्ट्रपतींना भेट, राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
PM Modi Security Breach: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चिंता व्यक्त केली आहे. याच संदर्भात मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे.
PM Modi Security Breach : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारी झालेल्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेच्या चुकीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चिंता व्यक्त केली आहे. याच संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीभवन येथे राष्ट्रपतींची भेट घेतली. तर उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनीदेखील या संदर्भात मोदींशी बातचीत केली आहे. मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबद्दल त्यांनी गंभीर चिंता व्यक्त करत उपराष्ट्रपतींनी सुरक्षा प्रोटोकॉलचे नियम अधिक कडक पद्धतीने राबवले गेले पाहिजेत जेणेकरून भविष्यात पुन्हा अशी चूक होणार नाही असं म्हटलं आहे.
राष्ट्रपतींनी घेतली या संदर्भात माहिती
राष्ट्रपतीभवनने केलेल्या ट्विटमध्ये रामनाथ कोविंद यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो ट्विट करत असं लिहिलं आहे, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि काल (बुधवारी) त्यांच्या ताफ्यात झालेल्या चुकीबद्दल माहिती घेतली. या संदर्भात राष्ट्रपतींनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून विवाद "अत्यंत दुर्दैवी" - देवीगौडा
तर देशाचे माजी प्रधानमंत्री एच.डी. देवीगौडा यांनी मोदींच्या सुरक्षेवरून उठलेल्या वादाला अत्यंत दुर्दैवी असं ट्विट करत म्हटलं आहे की, भारताच्या सर्वोच्च पदी असलेल्या व्यक्तीच्या सुरक्षेसंदर्भात कोणताच निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. जनता दलाचे (सेक्युलर) वरिष्ठ नेत्यांनीदेखील या बाबीवर भर देत भूतकाळातून शिकणे गरजेजे आहे असं म्हटलं आहे.
उड्डाणपूलावर मोदींना 20 मिनिटं करावी लागली प्रतिक्षा
कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काल (बुधवारी)पंजाबमध्ये पहिलाच दौरा होता. पंतप्रधान मोदी पंजाबमधील जनतेला संबोधित करणार होते. या दरम्यान मोदींच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याची घटना घडली. जिथे मोदींचा फिरोजपूर येथे दौरा होता तिथे काही आंदोलकांनी नाकेबंदी केली. त्यामुळे मोदींना एका उड्डाणपूलावर 20 मिनिटं प्रतिक्षा करावी लागली त्यानंतर मोदी दिल्लीला परतले. घडलेल्या घटनेनंतर मोदींना कोणत्याच कार्यक्रमात सहभागी होता आले नाही.
गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडून मागितला अहवाल
या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने कडक प्रतिक्रिया व्यक्त करत पंजाब सरकारवर या चुकीसंदर्भात अहवाल मागितला आहे. तसेच, या घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. तर केंद्री गृहमंत्री अमित शहा यांनी असं म्हटलं आहे की सुरक्षा प्रक्रियेत झालेला निष्काळजीपणा हा अमान्य आहे. याची पडताळणी नक्कीच घेतली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यंनी म्हटलं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- Security Of Pm Narendra Modi : फक्त पंतप्रधान मोदींनाच SPG सुरक्षा? एका दिवसाच्या सुरक्षेचा खर्च किती?
- PM Modi : पंतप्रधानांच्या सुरक्षेत पोलिसांकडूनच चूक? पोलिसांनी आंदोलकांना मार्गाची माहिती लीक केल्याचा दावा
- Punjab : सभेला गर्दी न जमल्याने पंतप्रधानांचा दौरा रद्द, पंजाबने भाजपच्या अहंकाराला आरसा दाखवला; काँग्रेसचे भाजपला प्रत्युत्तर