PM Modi : पंतप्रधानांच्या सुरक्षेत पोलिसांकडूनच चूक? पोलिसांनी आंदोलकांना मार्गाची माहिती लीक केल्याचा दावा
PM Modi Security : सुरक्षेतील त्रुटींमुळे बुधवारी पंतप्रधान मोदींची पंजाबमधील रॅली रद्द करण्यात आली. आंदोलकांना पोलिसांनीच पंतप्रधानांच्या मार्गाची माहिती पुरवल्याचा दावा भारतीय शेतकरी संघाने केलाय.
PM Modi Security : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा बुधवारी फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी नाकेबंदी केल्यामुळे उड्डाणपुलावर अडकून पडला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदींची यांचा दौरा रद्द करण्यात आला. आता, भारतीय किसान संघाने (BKU) पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या उल्लंघनात आपली भूमिका मान्य केली आहे. भारतीय किसान संघाचे सुरजित सिंह फूल यांनी दावा केला आहे की, पंजाब पोलिसांनीच पंतप्रधानांच्या मार्गाची माहिती त्यांना लीक केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना त्यांनी हा दावा केलाय.
पंजाबमधील फिरोजपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारची सभा रद्द करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदी दिल्लीला परतले. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता. पंतप्रधान मोदी पंजाबमधील जनतेला संबोधित करणार होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील या रॅलीत सहभागी होणार होते.
पंजाबच्या फिरोजपूरमधील रॅली रद्द करण्यावर केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, "अनेक कारणांमुळे पंतप्रधान दौऱ्यात आमच्यात नसणार आहेत, मात्र आम्ही हा कार्यक्रम रद्द न करता, पुढे ढकलत नसल्याचं पंतप्रधानांनी म्हटले आहे."
गृहमंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटलं की, "बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे दाखल झाले, तेथून ते हुसैनवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु, पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे पीएम मोदींना सुमारे 20 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली होती."
महत्त्वाच्या बातम्या :
- Gujarat Gas Leak : सूरतमध्ये गॅस दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, 25 हून अधिक जणांची प्रकृती गंभीर
- Coronavirus : अमेरिकेत कोरोना बाधितांसाठी नवे नियम, फक्त पाच दिवसांचे विलगीकरण पुरेसे : सीडीसी
- Omicron Cases In India: भारतातील 24 राज्यांत 2 हजार 135 ओमायक्रॉनचे रूग्ण, राजस्थानात एकाचा मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha