(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi on Sanjay Raut Comment : "मोदी नाही, औरंगजेब म्हणा", संजय राऊतांच्या टीकेला मोदींचं चोख प्रत्युतर; म्हणाले...
संजय राऊतांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) तुलना औरंगजेबाशी केली होती. संजय राऊतांच्या या टीकेवर आता खुद्द पंतप्रधान मोदींनी टिप्पणी केली आहे. मोदींनी वेगळ्या पद्धतीनं राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मोदींच्या टीकेवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
PM Modi on Sanjay Raut : मुंबई : लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. संजय राऊतांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) तुलना औरंगजेबाशी केली होती. संजय राऊतांच्या या टीकेवर आता खुद्द पंतप्रधान मोदींनी टिप्पणी केली आहे. मोदींनी वेगळ्या पद्धतीनं राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मोदींच्या टीकेवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. मोदी सरकार सध्या गेल्या दहा वर्षांचं रिपोर्ट कार्ड देशवासियांशी शेअर करत आहे. अशातच विरोधी पक्ष सातत्यानं पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षनेत्यांच्या या टीकेला आणि टिप्पण्यांना नेहमीच वेगळ्या पद्धतीनं उत्तर देतात. बुधवारी (20 मार्च) पंतप्रधान मोदींनी एका खासगी टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
'मोदी नाही, औरंगजेब म्हणा'; संजय राऊतांकडून पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज विरोधकांनी 104 व्यांदा मोदींना शिवीगाळ केली. औरंगजेब या नावानं माझा सन्मान केला. असं म्हणत मोदींनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले होते की, औरंगजेबचा जन्म पीएम मोदींच्या गावाजवळ झाला होता. त्यामुळे दोघांची विचारसरणी सारखीच आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. अशातच आता खुद्द मोदींनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आपण पुढच्या 25 वर्षांचा रोडमॅप बनतोय : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकार आपल्या दहा वर्षांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड ठेवत आहे. आम्ही पुढील 25 वर्षांचा रोडमॅप बनवत आहोत आणि आमच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांचा आराखडाही तयार करत आहोत. दुसरीकडे आमचे विरोधक आहेत. ते नवनवीन विक्रमही करत आहे. आज त्यांनीच दहावी शिवी मोदींना दिली. औरंगजेब म्हणून मला सन्मानित केलं.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर टीका करताना भाजप नेते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, औरंगजेबाचा गौरव करणाऱ्यांच्या पाठीशी उद्धव यांची शिवसेना उभी आहे. अशा सर्व वक्तव्यांना जनता योग्य प्रतिसाद देईल.