Sharad Pawar : मोदी आणि माझे चांगले संबंध, पण... ; शरद पवार पंतप्रधान मोदींबद्दल नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar on PM Modi : मोदी बारामतीत (Baramati) आले आणि म्हणाले की माझं बोट धरून राजकारणामध्ये आले, असं म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
Maharashtra Politics : पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि माझे संबंध चांगले आहेत, पण त्यांची धोरणे मला पटत नाहीत, मोदी बारामतीत (Baramati) आले आणि म्हणाले की माझं बोट धरून राजकारणमध्ये आले, असं म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. बारामतीत मेळाव्याला संबोधित करताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. शरद पवार यावेळी म्हणाले की, काम करीत असताना कधी मी पक्षाचा विचार केला नाही, विचारांशी पक्की राहण्याची भूमिका बारामतीच्या लोकांची आहे. त्यामुळे मी 50 वर्ष निवडून येतोय.
माझं बोट धरून राजकारणमध्ये आले
मतदान विचाराने करा. सत्ता आणि संपत्ती यावर निवडणूक होऊ लागली आहे, ती आपल्या हिताची नाही. मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत. पण त्यांची धोरणे मला पटत नाहीत. मोदी बारामतीत आले आणि म्हणाले की, माझं बोट धरून राजकारणमध्ये आले, असं म्हणत पवारांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीची मी स्थापना केली
त्यांनी पुढे म्हटलं की, मर्यादा आणण्यासाठी अनेक प्रकारच्या मर्यादा घालण्यात येत आहेत. आम्ही सांगेल तशी व्यक्ती नेमली तर, हवा तसा निकाल येईल म्हणून निवडणूक आयुक्त नेमण्याच्या पध्दतीत मोदींनी बदल केला. राष्ट्रवादीची स्थापना मी केली. निवडणूक आयोगाने निकाल दिला की, खरी राष्ट्रवादी शरद पवारांची नाही. ज्यांच्या हातात पक्ष दिला त्यांना विधीमंडळात, मी आणलं होतं, काही गोष्टी त्यांच्या वैयक्तिक आहे, ते वेळ देतात कष्ट करतात.
तेव्हा निवडणुकीला खर्च येत नसे. लोकांची बांधिलकी लोकं बघायचे. आजच्या आणि त्या काळच्या निवडणुकीत जमीन अस्मानाचा फरक होता. पैशाचा, सत्तेचा, यंत्रणेचा वापर होत नव्हता. लोकं वाटेल त्याला निवडून द्यायचे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
संसद संस्था ही जतन केली पाहिजे. मागे अधिवेशन झालं, त्या अधिवेशनात 24 मिनिटे आले. संसदेत बोलण्याची गरज प्रधानमंत्री यांना वाटत नाही, असे असेल तर लोकशाही धोक्यात येईल. अटल बिहारी वाजपेयी यांचे योगदान संसदेत आहे, त्यांनी कधी असा विचार केला नाही. यातून असे दिसत की, या संस्थाबद्दल त्यांना आस्था वाटत नाही. डॉक्टरांचा आणि माझा फार संपर्क आलाय. त्यांना म्हणालो, माझं काम चालु द्या बाकी काय करायचं आहे ते करा. वकील आणि वैद्यकीय क्षेत्रात बदल करण्याची गरज आहे, असंही पवारांनी म्हटलं आहे.