नाना पटोलेंनी पुतण्याचं डोकं फोडलं, रडले आणि निवडणूक जिंकली; भाजप नेत्याचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
Parinay Phuke: निवडणुकीच्या शेवटच्या दोन चार दिवसाआधी काही तरी गडबड करतात, काही ना काही षडयंत्र रचतात आणि लोकांची सहानुभुती मिळवून निवडणूक जिंकतात असे गंभीर आरोप परिणय फुके यांनी नाना पटोले यांच्यावर केले आहेत.
भंडारा : परिणय फुकेंनी (Parinay Phuke) नाना पटोलेंवर (Nana Patole) गंभीर आरोप केले आहेत. मागच्या निवडणुकीत नाना पटोलेंनी पुतण्याचं डोकं स्वत: फोडलं होतं. त्यानंतर त्यांनी आपले अश्रू ढाळल्याचा आरोप परिणय फुकेंनी केलाय. सकोलीच्या सभेत बोलतांना त्यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केलाय. गेल्या निवडणुकीत नाना पटोलेंनी रडून निवडणुक जिंकल्याचा आरोप परिणय फुकेंनी केलाय. साडेचार वर्षांपासून साकोली विधानसभा क्षेत्रातील (sakoli vidhan sabha) जनता रडत आहे, असे परिणय फुके म्हणाले.
परिणय फुके म्हणाले, मागच्या वेळेस (2019 ची विधानसभा निवडणूक) नाना पटोले यांनी स्वतःच्या हातानं स्वतःच्या पुतण्याचं डोकं फोडलं आणि आपले अश्रू गाळले, रडत राहिले आणि मतं मागितलं. आपल्या भागातील जनता यांच्या या मगरमच्छ अश्रुला वाहून गेलेत आणि नानांना निवडणुकीत निवडून दिलं. आता साडेचार वर्षांपासून साकोली विधानसभा क्षेत्रातील जनता रडून राहिली. एकही विकास काम नाही झाला, एकही रोजगार निर्मिती झाली नाही.
निवडणुकीअगोदर नाना काही ना काही षडयंत्र रचतात : परिणय फुके
2014 मध्ये प्रफुल्ल पटेल यांनी जो भेलचा प्रकल्प आणला त्यालाही रद्द करण्याचं पाप नाना पटोले यांनी केलं. इथेनॉल बनविण्याचा कारखाना आणला, हे विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर सगळ्यात पाहिले तो इथेनॉल कारखाना बंद करण्याचं पाप नाना पटोले यांनी केलं. नाना पटोले हे निवडणूक हरणार आहे, हे यांच्या लक्षात येतं, तसं हे निवडणुकीच्या शेवटच्या दोन चार दिवसाआधी काही तरी गडबड करतात, काही ना काही षडयंत्र रचतात, असेही परिणय फुके म्हणाले.
लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी नानांनी खोटे आरोप केले : परिणय फुके
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा येथील अपघातावर बोलताना परिणय फुके यांनी गंभीर आरोप केले आहे. काही दिवसांपूर्वी याची गाडी ट्रक नंबर थोडीशी खरचटली आणि यांच्या डोक्यातील ट्यूब लाईट जळाली आणि आतातर आपण हारून राहिलो. काहीतरी सहानुभूती लोकांची घेतली पाहिजे,आणि त्यानंतर त्यांनी हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र असल्याचे नानांनी सांगितल्याचे गंभीर आरोप भंडारा - गोंदियाचे माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर लावला.
हे ही वाचा :
मोदी सत्तेत आल्यावर विधानसभेवर परिणाम होणार, 4 जूननंतर इच्छुकांसाठी आमची दारं उघडी: प्रफुल पटेल