एक्स्प्लोर

Pankaja Munde On Dhananjay Munde Resign: राजीनामा आधीच घ्यायला हवा होता; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेंची 5 मोठी वक्तव्य

Pankaja Munde On Dhananjay Munde Resign: मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Pankaja Munde On Dhananjay Munde Resign: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या सहाय्याकांमार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्याकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरुन पायउतार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी पहिलं ट्वीट करुन सदसदविवेकबुद्धीला स्मरुन आणि वैद्यकीय कारणासाठी राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली आहे. (Dhananjay Munde Latest Marathi News)

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राज्यातील विविध नेत्यांची प्रतिक्रिया येत आहे. मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde On Dhananjay Munde Resign) यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. गेले काही आठवडे झाले, जेव्हापासून मी शपथ घेतली आहे त्यावेळीपासून मी वेळोवेळी या विषयावर व्यक्त झाली आहे. आज मी मुंबईवरून नागपुरात विमानात असेपर्यंत मुंबईत काय सुरू आहे मला माहित नव्हतं. आपण मला जे एकदम माईक लावून प्रश्न विचारला त्याची मला कल्पना नव्हती अजूनही माझं मुंबईत कोणाशी बोलणं झालं नाही. मी इंस्टाग्राम वर एक पोस्ट पाहिली,मी पंकजा गोपीनाथ मुंडे आहे म्हणून या विषयावर व्यक्त होणे अपेक्षित आहे म्हणून मी व्यक्त होत आहे.  मी जे बोलणार आहे, त्यानंतर कुठल्याही प्रश्न उत्तरासाठी जागा राहणार नाही, हा माणूस विचार दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे.  तुम्ही तुम्ही मला प्रश्न विचारला यापूर्वी संतोष देशमुख यांच्या मारण्यासंदर्भातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. इंस्टाग्रामवर मी एक पोस्ट पाहिली, ते व्हिडिओ उघडण्याची किंवा बघायची माझी हिम्मत देखील झाली नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 

पंकजा मुंडेंचे 5 मोठे विधान-

1. ज्यावेळी या खुर्चीवर मी बसले तेव्हा मी एक शपथ घेतलेली आहे, आमदारकीची शपथ घेतलेली आहे, कुठलाही ममत्व भाव, कुठलाही कोणाविषयी आकस किंवा द्वेष न बाळगता काम केले पाहिजे यावर मी ठाम आहे.

2. संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण  हत्येचा निषेध व्यक्त करताना मी मनापासून क्षमा मागते त्याच्या आईची, कारण ज्या मुलांनी ही हत्या केली आहे ते माझ्या पदरात असतील दिले तरीही त्यांना कडक शासन करा असे मी म्हटले असते, यापेक्षा कोणताही राजकीय नेता यापेक्षा वेगळे भाष्य करू शकणार नाही. 

3. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला मी त्याचाही स्वागत करते, हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. उशीर झाला. राजीनामा यापेक्षा शपथच नाही द्यायला पाहिजे होती. त्यामुळे कदाचित पुढच्या भागांना सामोरे जावं लागलं नसतं. 

4. धनंजय मुंडेंचा राजीनामा फार आधीच झाला असता, तर त्याला या सगळ्या वेदनांपासून गरिमामय मार्ग मिळाला असता. 

5. मी त्यांची लहान बहीण आहे, आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम केलं होतं. पण कोणत्याही आईला-बहिणीला आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून जावं लागेल. पण आपण खुर्चीवर बसून विचार करतो, तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकासारखा विचार केला पाहिजे. त्या परिवाराच्या जीवाच्या वेदनापुढे हे काही मोठे नाही, त्यांनी जो घेतलाय तो योग्य निर्णय आहे, देर आये दुरुस्त आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 

संबंधित बातमी:

Santosh Deshmukh Murder Case Photo: शब्दच नाहीत! कोणी लघवी केली, कोणी पँट काढली; संतोष देशमुखांच्या हत्येचे क्रूर PHOTO

Dhananjay Munde Resignation: देवेंद्र फडणवीस आग्रही, पण धनंजय मुंडे तयार नव्हते; काल बैठक अन् थेट आदेश, नेमकं काय घडलं?

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding: लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृती मानधनाच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृतीच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding: लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृती मानधनाच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृतीच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
Embed widget