एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pankaja Mundeon Beed Loksabha : मला प्रीतम मुंडे यांची हॅटट्रिक पाहायची होती, पण.., पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

Pankaja Munde on Beed Loksabha : लोकसभेच्या निवडणुकीत मला प्रीतम मुंडे यांची हॅटट्रीक बघायची होती. मात्र, अचानक पक्षाने मला उमेदवारी दिली.

Pankaja Munde on Beed Loksabha : "लोकसभेच्या निवडणुकीत मला प्रीतम मुंडे यांची हॅटट्रीक बघायची होती. मात्र, अचानक पक्षाने मला उमेदवारी दिली. मी दिल्लीत गेल्यावर देखील तुमच्यावर जी माया आहे ती कमी होऊ देणार नाही. चांगल्या माणसाला संसदेत बसवल्याशिवाय जनतेचे कल्याण होत नाही.", असं भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे म्हणाल्या.  पंकजा मुंडे यांनी आज वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे प्रचार सभा घेतली. या सभेमध्ये पंकजा मुंडे यांनी मंत्री असताना बीड जिल्ह्यात आपण काय विकास केला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.

जिल्ह्यातल्या जनतेला स्वाभिमान आणि इज्जत मिळवून दिली

पंकजा मुंडे म्हणाल्या,  आपल्याला एकदा दूध पोळलं आहे, आता ताकही फुकून प्यायचं आहे. राजकीय जीवनात माझी काही चूक नसताना मला पाच वर्ष घरी बसावं लागलं. बीड जिल्ह्यामध्ये जेवढी विकास काम केली, हीच माझी संपत्ती आहे. मी जिल्ह्यातल्या जनतेला स्वाभिमान आणि इज्जत मिळवून दिली आहे. सामाजिक न्यायाची भूमिका घेताना कोणालाही घाबरायचं नाही. आजपर्यंत मी कुणालाही जात विचारली नाही आणि यापुढेही विचारणार नाही. प्रत्येक गावामध्ये विकास करताना मी कधीच असं राजकारण केलं नाही.

पंकजा मुंडेंचा बजरंग सोनवणेंवर निशाणा 

जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी काहीच  विकास काम केली नाहीत. जेव्हा आम्ही सत्तेत आलो तेव्हा रस्ते आणि शौचालयाची काम पूर्ण झाली. त्यामुळे घडी गेली तर पिढी वाया जाते, असंही मुंडे यांनी सांगितले. मुस्लिम समाजाच्या सुरक्षेतेची जबाबदारी देखील आमचीच आहे. विरोधक खोटा प्रचार करून समाजामध्ये भीती निर्माण करत आहेत. पहिल्यांदा मराठा समाजाला भाजप सरकारनेच आरक्षण दिलं होतं,असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. 

बीडमध्ये पंकजा मुंडे वि. बजरंग सोनवणे लढत 

बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरवले आहे. या मतदारसंघात मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव आहे. त्यातच सोनवणेंनी जरांगेंची भेट घेतल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. बीडमधील वंजारी आणि ओबीसी समाज पंकजा मुंडे यांच्या मागे उभा राहू शकतो, तर मराठा समाज बजरंग सोनवणेंना साथ देऊ शकतो, असं समीकरण सध्या राजकीय विश्लेषक मांडत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मराठा वि.ओबीसी असा संघर्षहा पाहायला मिळत असल्याचे बोलले जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Rohit Pawar on Ajit Pawar : तिकडे मलिदा गँग, इकडे जनता अशी निवडणूक आहे, रोहित पवारांचा अजितदादांवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Eknath Shinde Delhi Meeting: फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, इतर पद...
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच शिंदे म्हणाले...
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 29 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines  : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 06 AM : 29 NOV 2024Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Eknath Shinde Delhi Meeting: फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, इतर पद...
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच शिंदे म्हणाले...
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
Embed widget