Rohit Pawar on Ajit Pawar : तिकडे मलिदा गँग, इकडे जनता अशी निवडणूक आहे, रोहित पवारांचा अजितदादांवर हल्लाबोल
Rohit Pawar on Ajit Pawar, Baramati : तिकडे मलिदा गँग आहे आणि इकडे जनता आहे. त्यामुळे जनता विरुद्ध नेता अशी लढत होईल. साडेतीन लाख ते चार लाखांच्या मताधिक्याने सुप्रिया सुळे निवडून येतील.
Rohit Pawar on Ajit Pawar, Baramati : "तिकडे मलिदा गँग आहे आणि इकडे जनता आहे. त्यामुळे जनता विरुद्ध नेता अशी लढत होईल. साडेतीन लाख ते चार लाखांच्या मताधिक्याने सुप्रिया सुळे निवडून येतील. पक्ष चोरीला गेला चिन्ह चोरीला गेले होते. लोकसभेच्या सहा महिने आधी ती सगळी यंत्रणा चोरीला गेली. ती सगळी यंत्रणा दादा स्वतःसाठी वापरत आहेत. ज्या मैदानावर गेली 40 वर्ष सभा होते ते मैदानही चोरीला गेले आहे. आता सगळेच चोरीला जाऊन जात असले तरी लोकांचा विचार चोरीला जाऊ शकत नाही, तोच विचार आणि तीच ताकद आणि विजय हा तुतारीचा झाल्याशिवाय राहणार नाही", असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते बारामतीत बोलत होते. यावेळी रोहित पवारांनी (Rohit Pawar) अजित पवारांवर चौफेर टीका केली.
विचार आणि परंपरा जपण्याची जबाबदारी सगळ्यांची असते
रोहित पवार म्हणाले, विचार आणि परंपरा जपण्याची जबाबदारी सगळ्यांची असते. दादा पलीकडे का गेले संपूर्ण दुनियेला माहित आहे. जर दादांना साहेबांचा आवाका माहित असेल तर त्यांचा प्रश्न आहे. मात्र, त्यांना आवाका खरचं माहिती असता तर दादांनी पवार साहेबांची साथ सोडली नसती. आम्ही का लढतोय हे आम्हाला माहित आहे ते सत्तेसाठी गेले ते त्यांना माहिती आहे. ज्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत ते त्यांच्यासाठी लढत आहेत. आमच्यासाठी विचार महत्त्वाचे आहेत म्हणून आम्ही विचारासाठी लढत आहोत.
आम्ही सगळेजण पवार साहेबांच्या बरोबर आहोत
तिथून पैसा ताकद दबाव तंत्र मोठ्या प्रमाणावर असू शकते. इथे सामान्य नागरिक, स्वाभिमानी लोक आणि आम्ही सगळेजण पवार साहेबांच्या बरोबर आहोत. पैशाची ताकद मोठी की लोकांची ताकद मोठी हे लवकरच समजेल. अजितदादांचे पूर्वीचे भाषणे काढावी लागतील. त्यामध्ये दादा स्वतःहून म्हणाले आहेत की, सुप्रिया सुळे यांचे काम चांगले आहे. दादा जर आता काही वेगळे बोलत असतील जे पूर्वी बोलले त्याच्या उलट बोलत असतील एवढे बदललेले दादा आम्ही पाहिलेले नाहीत. आजचे भाजपच्या भूमिका सांगणारे दादा हे बदललेले दादा आता सोसायटीमध्ये प्रचार करू लागलेत. गल्लीबोळात प्रचार करू लागले आहेत, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.
तुम्ही मोठे नेते आहात तुम्ही देशात फिरले पाहिजे
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, भाजपने त्यांची लोकल नेते अशी परिस्थिती करून ठेवली आहे. आम्ही आधी तेच म्हणत होतो की, तुम्ही मोठे नेते आहात तुम्ही देशात फिरले पाहिजे. महाराष्ट्र तुम्ही मतदारसंघावरून फिरले पाहिजे भाजपने त्यांना एक स्थानिक नेता करून टाकले आहे. त्यामुळे ते कधी कधी त्यातून अशा स्तरापर्यंत दादा पोहोचत आहेत. बारामतीमध्ये पूर्वी दहशत होती, मात्र कितीही दहशत केली तरी लोकांचा स्वाभिमान हा जास्त महत्त्वाचा असतो.
इतर महत्वाच्या बातम्या
BJP on Naresh Mhaske : नरेश म्हस्केंना उमेदवारी देऊन आमच्या पाठित खंजीर खुपसला, भाजप पदाधिकारी आक्रमक