एक्स्प्लोर

विखे कुटुंबाचा मला अभिमान; आशीर्वाद घेण्यासाठी राधाकृष्ण विखेंना भेटणार, निलेश लंकेंकडून स्तुतीसुमने

विखे कुटुंबियांचा आपल्याला अभिमान असून मी कुठेही गेलो तरी विखे कुटुंबीय आमच्या नगरचे असल्याचे सांगत असतो असंही लंकेंनी म्हटलंय

अहमदनगर: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Election)  महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke)  आणि महायुतीचे (Mahayuti)  उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil)  यांच्यात अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती.  शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी विखेंचा पराभव करत विजय मिळवला होता. अवघ्या 28 हजार मतांनी निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना धूळ चारत लोकसभेत विजय मिळाला होता.  ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची झाली होती. निवडणुकीनंतरही सुजय विखे पाटील  आणि खासदार निलेश लंके यांच्यातील संघर्ष सुरूच राहील असा कायास कार्यकर्ते बांधत असतानाच अहमदनगरमध्ये एका सत्कार समारंभामध्ये नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.या  पुढच्या काळात सहमतीचे राजकारण करणार असल्याचे संकेत निलेश लंके यांनी दिले आहेत.

निलेश लंकेंनी विखे कुटुंबियांवर स्तुतीसुमनं उधळलीत. यापुढे सहमतीचं राजकारण करणार असल्याचे संकेत लंकेंनी दिले आहेत. विशेष म्हणजे विखे कुटुंबियांचा आपल्याला अभिमान असून मी कुठेही गेलो तरी विखे कुटुंबीय आमच्या नगरचे असल्याचे सांगत असतो असंही लंकेंनी म्हटलंय. तर राधाकृष्ण विखे पाटील यांचे आशीर्वाद आपण घेणार असल्याचंही लंकेंनी म्हटलंय.  

मतभेद विसरून आता सहमतीचे राजकारण  करणार : निलेश लंके

निलेश लंके म्हणाले, विखे कुटुंबियांचा आपल्याला अभिमान असून मी कुठेही गेलो तरी विखे कुटुंबीय आमच्या नगरचे असल्याचे सांगत असतो.  राधाकृष्ण विखे पाटील यांचे आशीर्वाद आपण घेणार असून विविध विकास कामांसाठी आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आपल्याला जावे लागणार आहे. त्यामुळे सर्व मतभेद विसरून आता सहमतीचे राजकारण  करणार आहे. 

लहान माणसाने लहान माणसासारखे वागले पाहिजे: निलेश लंके

निलेश लंके म्हणाले, निवडणूक झाली आता मी त्यांच्याविरोधात टीका करणे योग्य नाही. झालं गेलं ते सोडून द्यायचे असते. विखे परिवार हा जिल्ह्यात मोठा आहे. सहकारामध्ये मोठे काम आहे. निवडणुकीमध्ये विरोधात बोलणे योग्य आहे. एखादा शब्द माझा घसरला एखादा त्यांचा गेला असेल पण जिल्ह्यात सहकारामध्ये मोठे नाव आहे. विरोधक आहे म्हणून कायमच विरोधात बोलायचे असं नसतं.  माझे एखादे काम असेल तर मी त्यांच्याकडे जाऊ शकतो. असे राजकारण पाहिजे. मी त्यांच्याकडे मारक्या म्हशीसारखे बघायचं त्यांनी माझ्याकडे असे नाही पाहिजे. लहान माणसाने लहान माणसासारखे वागले पाहिजे. मी लवकरच त्यांचा आशीर्वाद घ्यायला जाणार आहे. 

हे ही वाचा :

निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget