NCP on Manoj Jarange Patil Mumbai Morcha : जरांगेंच्या आंदोलनामागे पवार साहेबांचा हात असेल तर सिद्ध करून दाखवा; शरद पवार गटाचं सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान
NCP on Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे.

NCP on Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू असून, आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे. सरकारकडून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नसल्याने, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. आज ते पाणीही पिणार नाहीत, अशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता यावरून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान दिलं आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले की, डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे. शरद पवार यांचा हात आहे तर त्यांनी सिद्ध करून दाखवावे. पवारसाहेब बोलले नाही तर बोलतात पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी. अन् साहेब नाही म्ह्टले तर म्हणतात त्यांचा अदृश्य हात आहे. आता यांच्या मागे नक्की कोणाचा हात आहे की मराठे स्वयंस्फूर्तीने आलेत, की जरांगे पाटील स्वयंस्फूर्तीने आलेत ते सरकारने बघावं. लोकांमध्ये गैरसमज करून राजकारण करायचं बंद करावं, असे त्यांनी म्हटले आहे.
सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी
शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की, माझी सरकारला विनंती आहे, कोणी काय कोणाची भूमिका न बघता हे आंदोलन गांभीर्याने घ्यावे. सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. त्या समितीच्या अहवालाची वाट न बघता सरकारच्या समितीने बैठक घेऊन तत्काळ निर्णय घ्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
आणखी वाचा
























