अजित पवारांच्या दिवाळी पाडव्यावर सुप्रिया सुळेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, कोणाचही नाव न घेता बरंच काही सांगितलं!
बारामतीत आज दोन दिवाळी पाडव्याचे कार्यक्रम होत आहेत. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे.
बारामती : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) धामधुमीत बारामती हा मतदारसंघ (Baramati Constituency) सध्या राज्यभरात चर्चेचा विषय आहे. या जागेच्या रुपात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आणि अजित पवार यांच्यात थेट लढत होत आहे. ही जागा जिंकण्यासाठी दोन्ही बाजूने जोमात प्रचार केला जात आहे. याच प्रचाराचा भाग म्हणून दिवाळीनिमित्त अजित पवार तसेच शरद पवार यांच्यातर्फे दोन वेगवेगळ्या पाडव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यावरच राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपा, केंद्र सरकार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
1967 सालापासून आयोजित केला जातो कार्यक्रम
प्रत्येक दिवळीला शरद पवार यांच्याकडून बारामतीत दिवाळी पाडव्याचे आयोजन केले जाते. या दिवशी सर्व पवार कुटुंब एकत्र येते. या दिवशी शरद पवार हे लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. यावेळी मात्र अजित पवार यांनी काटेवाडी येथे आपल्या वेगळ्या दिवाळी पाडव्याचे आयोजन केले आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे 1967 साली पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून दरवर्षी आमच्याकडे हा अपक्रम आयोजित केला जातो, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
रोहित पवार यांच्यावर दिली प्रतिक्रिया
शरद पवार यांच्या पाडव्याला राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते रोहित पवार हे उपस्थित नव्हते. याबाबत विचारल्यावर रोहित पवार हे सध्या प्रचारात आहेत. ते या निवडणुकीत उमेदवार आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
हे दिल्लीच्या अदृश्य शक्तीचे यश
तसेच, राजकारण चालू राहील. सध्या दिवाळीचा सण आहे. त्यामुळे आपण दिवाळी साजरी करूयात, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी राजकारणावर भाष्य करणे टाळले. आज काटेवाडी या गावात अजित पवार यांनीदेखील त्यांचा स्वत:चा पाडवा आयोजित केला आहे. सकाळपासून त्यांना अनेक कार्यक्रते भेटायला जात जात आहेत. यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. घरं फोडणे, पक्ष फोडणे असले उद्योग दिल्लीची अदृश्य शक्ती करते. त्यामुळे हे सगळं दिल्लीच्या अदृश्य शक्तीचे यश आहे, अशी दोन वाक्यात सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
पवारांच्या पाडव्याला युगेंद्र पवार उपस्थित
दरम्यान, गोविंदबागेत आयोजित करण्यात आलेल्या पाडव्याला शरद पवार यांच्यासोबतच बारामतीचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार हेदेखील उपस्थित आहेत. सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि शरद पवार हे या कार्यक्रमात लोकांच्या शुभेच्छांना शुभेच्छा देत आहेत.
हेही वाचा :
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
महायुतीत जुंपली, औरंगजेब, रझाकार म्हणत रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तारांवर निशाणा