शायना एनसी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन गटात राडा, महिला कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
शायना एनसी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन गटात राडा झाल्याचे बघायला मिळाले आहे. यावेळी शायना एनसीच्या समर्थनार्थ जमलेल्या महिला कार्यकर्त्यांमध्ये थेट धक्काबुक्की झाली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि दक्षिण मुंबईचे विद्यमान खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी आज भाष्य करताना अप्रत्यक्षपणे शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी (Shaina NC) यांचा 'इम्पोर्टेड माल' असा उल्लेख केल्यानंतर गदारोळ सुरु झाला आहे. शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शायना एनसी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीचा उल्लेख महाविनाश आघाडी करत शायना एनसी यांनी जोरदार हल्लाबोल केला.
शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन गटात राडा
मात्र, तक्रार दाखल करून शायना एनसी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन गटात राडा झाल्याचे बघायला मिळाले आहे. यावेळी शायना एनसीच्या समर्थनार्थ जमलेल्या महिला कार्यकर्त्यांमध्ये थेट धक्काबुक्की झाली आहे. मिळालेल्या महितीनुसार शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन गटातच हा राडा झाला आहे. शायना एनसी यांच्या समर्थनार्थ नागपाडा पोलिस स्थानकात आलेल्या महिला कार्यकर्त्यांमध्येच वाद झाला आणि तो विकोपला जात नागपाडा पोलीस स्टेशनच्या आवारात धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे.
नागपाडा पोलीस स्टेशनच्या आवारात धक्काबुक्की
शायना एनसी पोलीस स्टेशनच्या आवारातून बाहेर पडताच दोन गटातील वादाला सुरुवात झाली. त्यामुळे अंतर्गत वादातून दोन गटात हा तणाव उफाळून आला. शिवसेना महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये नागपाडा पोलीस स्टेशनच्या आवारातच धक्काबुक्की सुरू झाली. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या नागपाडा पोलीस स्टेशनच्या आवारात काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद शांत केला असला तरी पक्षातील दोन गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
काय म्हणाले होते अरविंद सावंत?
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी शिवसेना नेत्या शाइन एनसी यांच्यावर निशाणा साधला आणि सांगितले की, त्यांची अवस्था बघा, त्या आयुष्यभर भाजपमध्ये राहिल्या आता दुसऱ्या पार्टीत गेल्या आहेत. इथं 'इम्पोर्टेड माल' चालत नाही, फक्त ओरिजनल माल येथे चालतो. त्यांच्या वक्तव्यावर मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांनी पलटवार करत माफी मागण्याची मागणी केली. "ते स्त्रीचा आदर करू शकत नाहीत," असे त्या म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या