एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Narhari Zirwal : नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसैनिकाची बंडखोरी, धनराज महालेंनी शड्डू ठोकला

Narhari Zirwal, Nashik : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात शिंदे गटाचे नेते धनराज महाले यांनी बंडखोरी केली आहे.

Narhari Zirwal, Nashik : राष्ट्रवादीचे नेते झिरवाळ यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, महायुतीकडून नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिंडोरीमध्ये शिंदेंच्या शिवसैनिकाने बंडखोरी केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार धनराज महाले यांनी  बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदार संघातून धनराज महाले यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये याबाबत चर्चा होणार का? असा सवाल विचारला जातोय. धनराज महाले हे शिवसेनेकडून  दिंडोरी मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटल्याने धनराज महाले यांनी बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नरहरी झिरवाळ या मतदारसंघाचे उमेदवार आहेत. 

नरहळी झिरवाळ यांनी भरला उमेदवारी अर्ज 

दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. सलग तिसऱ्यांदा नरहरी झिरवाळ दिंडोरी मतदार संघातून लढणार आहेत. त्यांना तिसऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नरहरी झिरवाळ दिंडोरी विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोकुळ झिरवाळ लढतील, अशी चर्चा होती. मात्र, गोकुळ झिरवाळ माझंच काम करतील, असा खुलासा गोकुळ झिरवाळ यांनी केला आहे.  

गोकुळ झिरवाळ माझंच काम करणार; नरहरी झिरवाळांचा खुलासा 

गोकुळ झिरवाळ हे नरहरी झिरवाळ यांचे पुत्र आणि ते महाविकास आघाडीकडून इच्छुक होते. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी जवळपास तयारी दर्शवली होती. मात्र, अद्यापपर्यंत त्यांच्या उमेदवारीबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. याच मतदारसंघातून धनराज महाले यांनी देखील बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  

उपमुख्यमंत्री अजित पवार जुलै 2023 मध्ये महायुतीमध्ये सामील झाले. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यावेळी नरहरी झिरवाळ यांनी अजित पवारांची साथ दिली होती. निवडणुकीच्या तोंडावर काही आमदारांनी अजित पवारांची साथ सोडली. मात्र, नरहरी झिरवाळ अजूनही अजित पवारांसोबत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Vidhansabha Election : सर्वच पक्षांमध्ये घराण्यांचा सुळसुळाट, दिग्गज नेत्यांच्या पोराबाळांना तिकीट, भावांनाही गोंजारलं

अजित पवारांवर दोन उमेदवारांचा 'प्रहार', मतदारसंघात बंडखोरी; महिला नेत्यानंही साथ सोडली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special ReportMNS Raj Thackeray Vidhan Sabha | मतांची अट, मनसेची मान्यता का रद्द होणार? Special ReportDevendra Fadanvis CM?|खुर्ची एक दावेदार अनेक,अजितदादांचा वादा शिंदेंना की फडणवीसांना? Special ReportSujay Vikhe Vs Balasaheb Thorat | टायगर अभी जिंदा है, थोरातांच्या शहरात येऊन सूजय विखेंनी कापला केक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
Embed widget