एक्स्प्लोर

Maharashtra Vidhansabha Election : सर्वच पक्षांमध्ये घराण्यांचा सुळसुळाट, दिग्गज नेत्यांच्या पोराबाळांना तिकीट, भावांनाही गोंजारलं

Maharashtra Vidhansabha Election 2024 : अनेक राजकीय पक्षांमध्ये दिग्गज नेत्यांच्या मुलांना, पत्नीला किंवा भावाला विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप झालेले नसले तरी अनेक पक्षांनी उमेदवार यादी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाने 99 जणांची नावे जाहीर केली आहेत. शिदेंच्या शिवसेनेने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 38 उमेदवार जाहीर केले आहेत. याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेने 65 जणांना तिकीट जाहीर केलं आहे. मात्र, काही जागांमध्ये दुरुस्ती केली जाणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

सर्वच पक्षांमध्ये घराणेशाही वाढली, प्रस्थापित नेत्यांच्या मुलांना उमेदवारी 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 38 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे श्रीवर्धनमधून उमेदवारी मिळाली आहे. तर सुनील तटकरे यांच्या मुलाला भारतीय जनता पार्टीकडून पेनमधून उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरु आहे. याशिवाय अजित पवारांनी छगन भुजबळ यांना येवला विधानसभा मतदारसंघातून यादी जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा भुजबळ यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेवर संधी दिली आहे. 

गणेश नाईक भाजपकडून लढणार, मुलाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी 

नवी मुंबईतील भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. ते आता बेलापूर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. तर गणेश नाईक स्वत: ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे मुलगा राष्ट्रवादीकडून तर वडील भाजपकडून निवडणूक लढत आहेत. 

राणे कुटुंबही दोन वेगवेगळ्या पक्षात, 2 जणांना उमेदवारी मिळणार 

खासदार नारायण राणे सध्या भारतीय जनता पक्षात आहेत. मात्र, त्यांचे दोन्ही पुत्र वेगवेगळ्या पक्षात असणार आहेत. नितेश राणे यांना भाजपकडून कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नारायण राणेंचे दुसरे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणेही विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. निलेश राणे कुडाळ-मालवण विधानसभेतून लढण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी दिली होती. आता भाजपने अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे घराणेशाहीला नेहमी विरोध करणाऱ्या भाजपने अनेक नेत्यांच्या मुलांना तिकीट दिली आहेत. 

उद्धव ठाकरेंचे पुत्रही निवडणुकीच्या रिंगणात 

उद्धव ठाकरेंनी गेल्या विधानसभा निवडणुकीतच त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना मैदानात उतरवले होते. आता वरळी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा ते मैदानात उतरणार आहेत. त्यांच्याविरोधात मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र अद्याप महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. याशिवाय उद्धव ठाकरे स्वत: विधानपरिषदेचे आमदार आहेत. 

राज ठाकरेंकडून अमित ठाकरेंना उमेदवारी 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, अमित ठाकरेंना तिरंगी लढतीला सामोरे जावे लागणार आहे. अमित ठाकरेंविरोधात एकनाथ शिदेंनी सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही माहीमधून उमेदवार दिला आहे.

धनंजय महाडिकांच्या कुटुंबात दोघांना उमेदवारी मिळणार ?

कोल्हापुरात भाजप नेते धनंजय महाडिक यांच्या घरातही दोघांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वीच भाजपने अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर कृष्णराज महाडिक यांनाही भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापुरात महाडिक घराण्यातही दोघांना उमेदवारी मिळवण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेकडून रवींद्र वायकर यांच्या पत्नीला तिकीट 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रवींद्र वायकर यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत रवींद्र वायकर यांनी अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर रवींद्र वायकर यांच्या जागेवर त्यांच्या पत्नीला मनीषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

निलेश लंके यांच्या पत्नीला शरद पवारांकडून उमेदवारी निश्चित 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव केला होता. त्यानंतर पारनेर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राणी लंके या पारनेर विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार असणार आहेत. 

आशिष शेलार यांच्या भावाला भाजपकडून तिकीट 

भाजपचे नेते आशिष शेलार यांना वांद्र पश्चिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय भाजपने आशिष शेलार यांच्या भावाला देखील मैदानात उतरवले आहे. त्यामुळे भाजपने अनेक कुटुंबात दोघांना उमेदवारी दिली आहे. 

संदीपान भुमरे यांच्या मुलाला तिकीट 

संदीपान भुमरे यांनी लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून विजय मिळवला होता. आता त्यांच्या मुलीला एकनाथ शिंदेंकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. 

गणपत गायकवाड यांच्या पत्नीला तिकीट 

भाजप नेते गणपत गायकवाड यांनी कल्याणमध्ये शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. त्यानंतर ते जेलमध्ये गेले होते. भाजपने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. 

अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी 

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंद अडसूळ यांच्या मुलाला देखील उमेदवारी देण्यात आली आहे. आनंद अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ शिंदेंच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढणार आहेत. 

रामदास कदम यांच्या मुलाला उमेदवारी 

एकनाथ शिंदेंनी रामदास कदम यांच्या मुलालाही उमेदवारी जाहीर केली आहे. योगेश कदम हे दापोलीमधून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. 

उदय सामंत यांच्या भावाला तिकीट 

मंत्री उदय सामंत स्वत: निवडणुकीच्या रिंगणात असताना त्यांचे बंधू देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने त्यांच्या भावाला उमेदवारी जाहीर केली आहे. 

रावसाहेब दानवे यांच्या मुलाला दुसऱ्यांना उमेदवारी 

रावसाहेब दानवे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. भाजपने त्यांचा मुलगा संतोष दानवे यांना भोकरदनमधून उमेदवारी जाहीर केली. यापूर्वी देखील संतोष दानवे या मतदारसंघातून निवडून आले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Supreme Court on Ajit Pawar NCP : अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर 'न्यायप्रविष्ठ'चा उल्लेख नाही! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश

 


 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget