![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
''नरेंद्र मोदी घुम रहे है बनकर भारत का आत्मा...''; शरद पवारांवरील टीकेवर आठवलेस्टाईल काव्यमय फटकेबाजी
मोदींच्या या विधानावरुन जयंत पाटील, संजय राऊत, उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांनीही मोदींवर पलटवार केला होता
![''नरेंद्र मोदी घुम रहे है बनकर भारत का आत्मा...''; शरद पवारांवरील टीकेवर आठवलेस्टाईल काव्यमय फटकेबाजी Narendra Modi Ghum Rahe Hai Bankar Bharat Ka Atma Ramdas Athawale style poetic lashing out at criticism of Sharad Pawar ''नरेंद्र मोदी घुम रहे है बनकर भारत का आत्मा...''; शरद पवारांवरील टीकेवर आठवलेस्टाईल काव्यमय फटकेबाजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/01/1c4a8d79bc1dc9f9441466d967d8d64017145790839621002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली. एक दिवसात तीन सभांचा धडाका लावत मोदींनी राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Shrad Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला होता. विशेष म्हणजे, पुण्यातील सभेतून त्यांनी नाव न घेता शरद पवारांवर थेट हल्लाबोल केला. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही व्यासपीठावर असताना भटकती आत्मा असा उल्लेख करुन मोदींनी शरद पवारांमुळे राज्याचं व शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं म्हटलं होतं. मोदींच्या या विधानावरुन राज्यात चांगलाच गदारोळ माजला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधानांच्या विधानावर पलटवार करत त्यांना सुनावलं. आता, केंद्रीयमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही मोदींच्या विधानाचा संदर्भ देत आपल्या काव्यमय शैलीत फटकेबाजी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भटकती आत्मा असा उल्लेख करताना नाव न घेता शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. मोदींच्या या विधानावरुन जयंत पाटील, संजय राऊत, उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांनीही मोदींवर पलटवार केला होता. आता, रिपाइंचे प्रमुख आणि केंद्रीयमंत्री आठवले यांनी सोशल मीडियातून या वादात उडी घेतली आहे. आठवलेंनी ट्विटरवरुन त्यांच्या कवितास्टाईलने फटकेबाजी केली आहे.
नरेंद्र मोदी घुम रहे है बनकर भारत का आत्मा
4 जून को काँग्रेस और इंडी आघाडी का करदेगी जनता खात्मा !
नरेंद्र मोदी घुम रहे है बनकर भारत का आत्मा
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) May 1, 2024
4 जून को काँग्रेस और इंडी आघाडी का करदेगी जनता खात्मा ! pic.twitter.com/NLwnfvtyGp
अशा शब्दात आठवलेंनी कवितेतून इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला आहे. आठवलेंच्या या कवितेचीही सोशल मीडियाच चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. दरम्यान, मोदींच्या विधानाबद्दल अजित पवार यांनाही पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, उत्तर देताना पुढील सभेत मी मोदींसोबत व्यासपीठावर असल्यास त्यांना भटकती आत्मा ह्या त्यांच्या विधानाचा नेमका संदर्भ काय आहे, ते विधान कोणाबाबत होते हे विचारेल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवारांना दररोज भेटतो
शरद पवार यांना मी दिल्लीत रोज भेटतो. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी आमची मैत्री कायम आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री होती तशीच आमची देखील मैत्री असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं. तसेच, भविष्यात आणखी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मी करेन. आता अजित पवार आमच्यासोबत आले आहेत, फक्त शरद पवार राहिले असून याबाबत भविष्यात विचार करू असेही, आठवलेंनी म्हटले आहे.
भाजपा विधानसभेला 10 जागा देणार
मला तिकीट दिलं नाही तरीदेखील मी भाजपसोबतच आहे, मी सध्या राज्यसभेवर असून 2026 पर्यंत खासदार आहे. त्यानंतर देखील मला राज्यसभा मिळेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे. पण, लोकसभा निवडणुकांसाठी आम्हाला एकतरी जागा मिळावी अशी अपेक्षा होती. महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले असते तर नक्की मिळाली असती. जागा मिळाली नसली तरी मी महायुतीसोबत आहे,माझा बिनशर्त पाठिंबा नाही. आमची फडणवीस यांच्यासोबत बोलणी झाली आहे. RPI ला राज्यात एक मंत्रिपद आणि विधानसभा निवडणुकीत 10 जागा देण्याचं त्यांनी मान्य केल्याचं गणितही आठवलेंनी सांगितलं.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)