Narendra Modi 3.0 : अमित शाहांच्या खात्याचं राज्यमंत्रीपद मुरलीधर मोहोळांकडे, रक्षा खडासेंकडे क्रीडा खातं, महाराष्ट्रातील मंत्र्याकडे कोणकोणती खाती?
Narendra Modi 3.0 : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (दि.10) पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आज खातेवाटपाला सुरुवात झाली आहे. एनडीएच्या सरकारमध्ये 72 जणांनी शपथ घेतली होती.
Narendra Modi 3.0 : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (दि.10) पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आज खातेवाटपाला सुरुवात झाली आहे. एनडीएच्या सरकारमध्ये 72 जणांनी शपथ घेतली होती. त्यानुसार नितीन गडकरी, अमित शाह, एस जयशंकर आणि राजनाथ सिंह यांचे खाते कायम ठेवण्यात आले आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वेमंत्रालय मिळालं आहे.
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणती खाती?
नितीन गडकरी - रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय
पियुष गोयल - वाणिज्य मंत्रालय
रक्षा खडसे - क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ - सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री
रामदास आठवले - सामाजिक न्याय राज्यमंत्री
प्रतापराव जाधव - आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री
महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. दोघांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची हॅटट्रिक केली आहे. गडकरी यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर पियुष गोयल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य पियुष गोयल यांना मिळाले होते. दरम्यान, आता त्यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद खेचून आणले आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय?
अमित शाह - गृहमंत्रालय
राजनाथ सिंह - संरक्षण मंत्रालय
एस जयशंकर - परराष्ट्र
नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक
निर्मला सीतारमन - अर्थमंत्रालय
शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय
जतीन राम - सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
पियुष गोयल -वाणिज्य
अन्नपूर्णा देवी - महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूपेंदर यादव - पर्यावरण
राम मोहन नायडू - नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा - आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल - पोर्ट शिपिंग मंत्रालय
सी आर पाटील - जलशक्ती
किरण रिजीजू - संसदीय कार्यमंत्री
धर्मेंद्र प्रधान - शिक्षण मंत्री
राज्यमंत्री
श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
शोभा करंदाजे - राज्यमंत्री - सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
शांतनु ठाकुर - पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री
Modi cabinet portfolios: Shivraj Singh Chouhan likely to get the Ministry of Agriculture and Farmers Welfare and Ministry of Rural Development and Ministry of Panchayati Raj
— ANI (@ANI) June 10, 2024
(File photo) pic.twitter.com/DabQevn2lF
Portfolio for PM Modi-led Union Cabinet announced
— ANI (@ANI) June 10, 2024
Amit Shah, Rajnath Singh, Nitin Gadkari, Nirmala Sitharaman, Dr S Jaishankar Piyush Goyal and Ashwini Vaishnaw retain their ministries. pic.twitter.com/LkZ0MQiTnk
Jitin Prasada to be MoS in the Ministry of Commerce and Industry and in the Ministry of Electronics and Information Technology
— ANI (@ANI) June 10, 2024
Ramdas Athawale to be MoS in the Ministry of Social Justice and Empowerment
Nityanand Rai to be MoS in the Ministry of Home Affairs
Anupriya Patel to be… pic.twitter.com/l7iDuayARf
इतर महत्वाच्या बातम्या