Nana Patole : भ्रष्टाचाराचे समर्थन करणारे कृषिमंत्री शेतकऱ्यांसाठी काय काम करणार; नाना पटोले यांची सरकारवर सडकून टीका
Nana Patole: भाजप आणि महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खणारं सरकार असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते नाना पटोले (Nana patole) यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

भंडारा : भाजप (BJP) आणि महायुतीचं (Mahayuti) सरकार हे शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खणारं सरकार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी तत्कालीन डीबीडी योजनेत बदल करून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी जे काही पैसे त्यांच्या डायरेक्ट खात्यात दिले जात होते, ते पैसे त्यांना न देता सरकारनं डीबीटी योजनेला बगल दिलाय. त्यांचा अधिकार नसताना सुद्धा साहित्य खरेदी करण्यात आली. ज्या गोष्टीची गरज नाही, त्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्या अजूनही गोडाऊनमध्ये आहे. पूर्ण वस्तू नं घेता त्या कागदावर दाखविण्यात आलेले असून यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेत करण्यात आला आहे. असा आरोप करत काँग्रेस नेते नाना पटोले (Nana patole) यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. त्या थांबविण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा वाढतील, याचं धोरण भाजप सरकार करीत असल्याचं दिसून येत असल्याचा आरोप ही नाना पटोले यांनी केला आहे. योजनांमध्ये चार ते पाच टक्के भ्रष्टाचार असतोचं अशी जाहीर कबुली कृषिमंत्र्यांनी दिलेलीचं आहे. विद्यमान कृषिमंत्री हे भ्रष्टाचाराचे समर्थन करणारे आहेत, हे शेतकऱ्यांसाठी काय काम करणार? असा प्रश्न नाना पाटोले यांनी उपस्थित करताना या सरकारचं एकच काम आहे जनतेचा पैसा लुटणे महाराष्ट्राला बरबाद करणं. अशा प्रकारचं वक्तव्य महाराष्ट्रात सरकारकडून करण्यात येत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला आहे.
महायुतीचं सरकार हे तीन तिघडा, काम बिघाडा सरकार- नाना पटोले
महायुतीचं सरकार हे तीन तिघडा काम बिघाडा सरकार आहे. या सरकारचं चरित्र आपण पाहिलय की, पालकमंत्र्यांच्या बाबत वाद चालू आहे. खाते वाटपातमध्ये वाद झालेला आहे. त्यामुळे या सरकारचं मलाईदार खाते, मलाईदार जिल्हे आणि लूटपाट हा जो वैचारिक मानसिकता आहे हे या सरकारची यातून दिसून येत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौरा आणि तेथील आढावा बैठकीवर नाना पटोले बोलत होते.
सरकारनं पीक विमा धोरणात बदल केला पाहिजे- नाना पटोले
पिक विमा कंपनीचं प्रिमियम हे सरकारला भरावा लागतं. जनतेच्या घामाचा पैसा जो सरकारी तिजोरीत जातो, त्या पैशाला सगळं प्रिमियम भरल्या जातं. पिक विमा कंपन्या या मोदीजींच्या मित्रांच्या आहेत. एक रुपया ऐवजी सर्व रक्कम शेतकऱ्यांकडून घ्या, मात्र सरकारनं पीक विमा धोरणात बदल केला पाहिजे. धान उत्पादक शेतकरी जर असेल आणि उभ्या पिकावरून पाणी वाहून गेलं तर त्याचं नुकसान ते ग्राह्य धरल्या जात नाही. मोठ्या प्रमाणात आमच्याकडं नद्या आहेत, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पण, शेतकऱ्यांचं नुकसान होऊन सुद्धा त्याला पीक विमा मिळत नाही. यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या नुकसान झालं त्याचं नुकसान भरपाई अजूनही सरकारनं दिलेली नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना पीक विमा धोरणात बदल करण्याचं धोरण आम्ही आखलं होतं. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला तातडीनं देता यावा, यासाठी महाविकास आघाडीचे सरकार असताना पिक पॅटर्नमध्ये आणखी एक नवीन पॅटर्न आम्ही आखलं होतं.
हा नवीन पॅटर्न सोडून महायुती सरकारनं शेतकऱ्यांना लुटून मोदींच्या मित्रांना या पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांऐवजी पिक विमा कंपनीला कसा फायदा होईल याचं धोरण आखल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लुटण्याचा हा धंदा बंद करून हा जो सरकारकडून दिखावा करण्यात येत आहे, तो बंद करावा अशी टीका नाना पटोले यांनी राज्य सरकारच्या पिक विमा योजनेच्या नवीन धोरणावर केली आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

