Nagpur Lok Sabha Result 2024 : नितीन गडकरींच्या विजयाची हॅटट्रिक! मध्य नागपूर ठरले विजयीरथाचे सारथी; उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात रुतले चाक
देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर मतदारसंघाकडे राज्यासह अवघा देशाचे लक्ष लागले होते. अखेर नितीन गडकरी यांनी विजयाची हॅटट्रिक करत काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचा दारूण पराभव केला आहे.
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024)अखेर लागला आहे. त्यानंतर आता देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्रही लवकरच स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या समोर आलेला मतदारांच्या मतदानाचा कल लक्षात घेता राज्यातल्या लोकसभा महालढत क्षणाक्षणाला बदलताना आणि अतीतटीची होताना दिसली. राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले असून 29 जागी मविआने विजय मिळवला आहे.तर महायुतीला अवघ्या 18 जागांवर समाधान मानावं लागले आहे. तर एक जागी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहे.
देशपातळीवर एनडीए आघाडी 294 जागा मिळवत आघाडी कायम ठेवली असली तरी इंडिया आघाडी 232 जागा मिळवत मसंडी मारली आहे. तर 17 ठिकाणी इतर खासदार विजयी झाले आहेत. अशातच विदर्भातही महायुतीला मोठा धक्का बसला आहे आहे. तर विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे.
नितीन गडकरींच्या विजयाची हॅटट्रिक!
विदर्भातील दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश आले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी यश आले आहे. तर राज्यासह विदर्भातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि हायव्होल्टेज मतदारसंघांमध्ये समावेश असलेल्या नागपूर (Nagpur) लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते आणि विद्यामन केंद्रीय मंत्री नितीन गडकारींनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्यात थेट लढतील गडकारींनी विजय माळ आपल्या गळ्यात घातली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील (Nagpur Lok Sabha Election Result 2024) पहिल्या फेरी पासून नितीन गडकरींची सरसी कायम असल्याचे चित्र होते. तर अखेरच्या फेरीत नितीन गडकारींनी 1,37,603 मतांनी आघाडी मिळवत विजय मिळवला आहे. नितीन गडकरी यांना 6 लाख 55 हजार 027 मते मिळाली तर विकास ठाकरे (Vikas Thakre) यांना 5 लाख 17 हजार 424 मते मिळवत पराभव स्वीकारावा लागलाय.
नागपूर लोकसभेत विधानसभा निहाय आघाडी
नागपूर लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी पाच विधानसभा क्षेत्रात भाजपला तर एक विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. मात्र 2019 च्या तुलनेत सर्वच विधानसभा क्षेत्रात भाजपची आघाडी कमी झाल्याचे दिसून येत आहे.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रात भाजपला 2019 मध्ये 65069 मतांची आघाडी होती. मात्र यंदा फडणवीस यांच्या क्षेत्रात भाजपची आघाडी 33,535 एवढी आहे. म्हणजेच फडणवीस यांच्या मतदारसंघात भाजपची आघाडी जवळपास 36 हजारांनी कमी झाली आहे.
- भाजप आमदार मोहन मते यांच्या मतदारसंघात 2019 मध्ये 43524 मतांची आघाडी होती. मात्र ती यंदा घसरून 29712 पर्यंत खाली आली आहे.
- भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मतदारसंघात 2019 मध्ये नितीन गडकरी यांना 75380 मतांची आघाडी होती मात्र यंदा ती काहीशी कमी होऊन 73371 एवढी राहिली आहे.
- भाजप आमदार विकास कुंभारे यांच्या मतदारसंघात 2019 मध्ये भाजपला 22494 मतांची आघाडी होती मात्र यंदा ती 25861 पर्यंत वाढली आहे.
- काँग्रेस आमदार नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रात गेल्या वेळेला काँग्रेसला 8910 मतांची आघाडी होती. मात्र यंदा नितीन राऊत यांच्या क्षेत्रात काँग्रेसची आघाडी तिप्पट वाढून ती 32215 झाली आहे.
- काँग्रेस आमदार आणि नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या स्वतःच्या पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रात ही ते आघाडी घेऊ शकले नाही. 2019 मध्ये या मतदारसंघातून भाजपला 19 हजार मतांची आघाडी होती. यंदा गडकरी यांनी विकास ठाकरे यांच्याच मतदारसंघात 6584 मतांची आघाडी घेतली आहे...
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1
महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8
इतर महत्वाच्या बातम्या