एक्स्प्लोर

विजयी घोषित करुनही अमोल किर्तीकर हरले कसे? ठाकरे गटाने 19 ते 23 व्या फेरीचं गणित मांडलं, 650 मतांचा फरक सांगितला!

Anil Parab: मतमोजणीत 19 व्या फेरीपासून पारदर्शकतेचा अभाव आहे. हा विजय आमचा आहे.  हा विजय सरकारी यंत्रणेचा वापर करून हिरावला गेला, असा आरोप अनिल परबांनी केला आहे.

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम (Mumbai North West)  मतदारसंघाच्या मतमोजणीत 19 व्या फेरीपासून पारदर्शकतेचा अभाव असल्याचा  आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी (Anil Parab)  केला आहे.   एआरओ (असिस्टंट रिटंनीग ऑफिसर)  आणि आमच्या मतांमध्ये  650  मतांचा फरक आहे.  19 व्या राऊंडनंतर आमची मत मोजलीच नाही, असा  खळबळजनक  दावा अनिल  परबांनी केला आहे.  मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  देखील उपस्थित होते.  

अनिल परब म्हणाले,  4  जूनला निकाल लागला यामध्ये अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला. हा सर्व संशयास्पद निकाल आहे.  19 व्या फेरीनंतर निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे डावलण्यात आली.  प्रत्येक फेरीनंतर कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली याची आकडेवारी दिली जाते. प्रत्येक राउंडनंतर 19 व्या फेरीपर्यंत हे सगळं व्यवस्थित सुरु होतं. पक्षाचे प्रतिनिधी आकडेवारीची टॅली करतात. मग RO आकडेवारी फायनल करतात. RO आणि उमेदवारचा प्रतिनिधी यामध्ये अधिक अंतर होतं. मतं मोजून झाल्यानंतर फॉर्म 17C भरून द्यायचा असतो. ज्यामध्ये आपल्या उमेदवाराला किती मतं मिळाली हे द्यावं लागतं. पण फॉर्म अनेकांना दिले नाहीत. आमच्या टॅलीमध्ये 650 पेक्षा अधिक मिळाले आहेत. 650 मतांचा फरक आमच्या आणि त्यांच्या टॅलीमध्ये येतोय. निकाल जाहीर करण्याआधी निवडणूक अधिकारी सांगतात की, आम्ही निकाल जाहीर करतोय. मात्र यामध्ये काहीच सांगण्यात आलं नाही.

सीसीटीव्ही फुटेज देण्यास वेळखाऊपणा का? अनिल परबांचा सवाल

निकालात गडबड वाटल्यानंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज  मागितलं तर दोन दिवसात देऊ असं आम्हाला सांगितलं. पण नंतर हे फुटेज देण्यास नकार दिला. कोर्टाच्या आदेशानुसार देऊ शकत नाही असं ते आता सांगत आहेत. मतमोजणीवेळी मोबाईल वापरला गेला, त्यावर कोणाचे फोन आले याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. 10 दिवसानंतर गुन्हा दाखल झाला. या 10 दिवसात मोबाईल बदलले गेले असा आमचा आरोप आहे. गुरव कोण आहे? अधिकाऱ्याने यांचा मोबाईल वापरला का? सगळ्यांची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे, अशी मागणी अनिल परब यांनी केली. 

आम्ही कोर्टात याचिका दाखल करणार : अनिल परब

अनिल परब म्हणाले,  हा विजय आमचा आहे.  हा विजय सरकारी यंत्रणेचा वापर करून हिरावला गेला. आरओचा इतिहास तपासा, किती भ्रष्टाचारच्या केसेसमध्ये त्या आहेत. इलेक्शन कमिशनने तक्रार घेतली पाहिजे यावर चौकशी व्हावी. आम्ही दोन दिवसात याचिका  कोर्टात दाखल करू. 19  ते 23 फेरीमध्ये हा 650 मतांचा फरक आहे. रेटून नेण्याचं काम आरओने केलं. आम्ही पीपल रिप्रेजेंस्टेशन अॅक्ट अंतर्गत सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करणे यावर आम्ही याचिका दाखल करणार आहोत. 

Video :

हे ही वाचा :

मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget