एक्स्प्लोर

दोन पराभवानंतर पंकजा मुंडे पुन्हा आमदार, घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत महायुतीने 9 जागा जिंक्ल्या तर महाविकास आघाडीने 2 जागा जिंकल्या होत्या,

Pankaja Munde Oath: दोन पराभवानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा एकदा आमदार झाल्या असून आज त्यांनी विधान परिषदेच्या (vidhan Parishad Election) सदस्यत्वाची शपथ घेतली. 2019 विधानसभेत आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा अगदी थोडक्यात पराभव झाल्यानंतर आज त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी शपथ घेतली.  राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी झाला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. सकाळी विधान परिषदेच्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी पार पडला आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा संधी दिली. पंकजा मुंडे यांच्यासह योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गरजे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव या नवनिर्वाचित सदस्यांचा ही शपथविधी पार पडला.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी झाली होती

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत महायुतीने 9 जागा जिंक्ल्या तर महाविकास आघाडीने 2 जागा जिंकल्या होत्या, 12 उमेदवारांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमका कोण विजयी होणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेर, मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटल्याचं प्रथमदर्शन दिसून येत आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भाजप महायुतीचा वरचष्मा दिसून आला होता.  

काँग्रेसची 8 मतं फुटल्याची जोरदार चर्चा

विधानपरिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच काँग्रेसची मतं फुटणार, अशी चर्चा होती. या निवडणुकीत अजित पवार गटाला दोन उमेदवार निवडून आणणे कठीण होते. त्यासाठी त्यांना अतिरिक्त मतांची गरज होती. विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यावर शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांनी पहिल्या पसंतीची 23 मतं मिळवत विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसची 8 मतं फुटल्याची जोरदार चर्चा आहे.

भाजपचे तरुण चेहरे विधानपरिषदेत

भाजपची यंग ब्रिगेड विधानपरिषदेत दिसणार आहे. भाजपचे योगेश टिळेकर, परिणय फुके, पंकजा मुंडे आणि अमित गोरखे यांचा विजय झाला. अमित गोरखेंच्या रूपानं मातंग समाजातील तरूण चेहरा विधानपरिषदेत दिसणार आहे. तर योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळाले आहे. याशिवाय, सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता पुन्हा आमदार झाला आहे. 

हेही वाचा:

भावना गवळींकडून शपथविधीवेळी 'जय महाराष्ट्र, जय एकनाथ' असा उल्लेख; तर मिलिंद नार्वेकरांनी बाळासाहेबांना नमन करत मानले ठाकरे परिवाराचे आभार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Sharad Pawar on PM Modi : देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 10 November 2024Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHADhananjay Mahadik Election Commission : महिलांना धमकी, धनंजय महाडिक यांना निवडणूक आयोगाची नोटीसABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 16 June 2023

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Sharad Pawar on PM Modi : देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
दीड एकरात शिवरायांचं भव्य मंदिर, शिवमूर्तीचं अयोध्या कनेक्शन; महाराष्ट्रात उभारतंय पहिलं देऊळ
दीड एकरात शिवरायांचं भव्य मंदिर, शिवमूर्तीचं अयोध्या कनेक्शन; महाराष्ट्रात उभारतंय पहिलं देऊळ
Bacchu Kadu : लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, लाडकी बहीणचं तुम्हाला धडा शिकवेल, बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार
लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार
मी संधीसाधू तर शरद पवार कोण?; अशोक चव्हाणांचा प्रतिसवाल, जरांगेंच्या भूमिकेवरही परखड मत
मी संधीसाधू तर शरद पवार कोण?; अशोक चव्हाणांचा प्रतिसवाल, जरांगेंच्या भूमिकेवरही परखड मत
Bhosri Vidhansabha election 2024 : भोसरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा भाजपकडून महेश लांडगेंना संधी; MVA कडून शरद पवारांच्या पक्षाने दिली अजित गव्हाणेंना संधी
भोसरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा भाजपकडून महेश लांडगेंना संधी; MVA कडून शरद पवारांच्या पक्षाने दिली अजित गव्हाणेंना संधी
Embed widget