एक्स्प्लोर

Gopichand Padalkar : लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका, सुप्रिया सुळेंवर पडळकरांची शेलकी टीका

शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे. सुप्रिया सुळे या लहानपणीपासून त्यांच्याकडूनच हे सगळं शिकल्या असल्याची जहरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय.

Gopichand Padalkar on Supriya Sule : शरद पवार (Sharad Pawar) हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या लहानपणीपासून त्यांच्याकडूनच हे सगळं शिकल्या असल्याची जहरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)यांनी केलीय. लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका. जसा बाप तशीच लेक असं म्हणत पडळकरांनी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला.  

सुप्रिया सुळे त्यांच्यातली 'किडकी बहिण' महाराष्ट्राला दाखवतायेत, पळकरांची टीका

सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्याबद्दल सहानुभूती दाखवू नका असं बोलतात. अजित पवार तिकडं लाडकी बहिण योजनेसाठी राज्यभरात फिरत आहेत.  पण इथं सुप्रिया सुळे त्यांच्यातली 'किडकी बहिण' महाराष्ट्राला दाखवत असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. मनोज जरांगे पाटील, एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे तिघही मराठा आहेत,  म्हणून जरांगे शिंदेंबद्दल बोलायच नाही असं सुप्रिया सुळे बोलल्या असल्याचे पडळकर म्हणाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता यात वेळीच हस्तक्षेप करायला पाहिजे. कारण, मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन इथं महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पडळकर म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस यांना केवळ ब्राम्हण आहेत म्हणून लक्ष्य केलं जातंय

जरांगे-शिंदे यांच्याशी वैर नाही, पण देवेंद्र तुझी खैर नाही!" असे संदेश देणारे लोक देवेंद्र फडणवीस साहेबांना केवळ ब्राम्हण आहेत म्हणून लक्ष्य करत असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. महाराष्ट्राला जातीयतेच्या आगीत झोकणारे शरद पवार पुरोगामी मुखवटा घालून जातीवादाचे विष महाराष्ट्रात पसरवत असल्याची जहरी टीका पडळकर यांनी यावेळी केली. फडणवीस यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचे पडळकर म्हणाले. पवारांचा एक फॉर्म्युला आहे. पुरोगामीपणाच्या बाता मारायच्या आणि जातीयवादावर चर्चा घडवायच्या असे पडळकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस तुम्हाला पुरुन उरले आहेत. ते कशातच सापडत नाहीत म्हणून त्यांच्या जातीवर बोलायचे असेही पडळकर म्हणाले. लहानपणापासून सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्याकडून शिकल्या आहेत. शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ असल्याचे पडळकर यावेळी म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन महाराष्ट्रात संभ्रमाचे वातावरण निर्माण केलं जात असल्याचेही गोपीचंद पडळकर म्हणाले. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत हस्तक्षेप करावा असेही जरांगे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Gopichand Padalkar on Rohit Pawar : पवारांचा मूळ डीएनए लबाडीचा; संस्था, सरकार, देवस्थानाच्या जमिनी लुटण्याचा पहिल्यापासून छंद; गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget