Gopichand Padalkar on Rohit Pawar : पवारांचा मूळ डीएनए लबाडीचा; संस्था, सरकार, देवस्थानाच्या जमिनी लुटण्याचा पहिल्यापासून छंद; गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर आरोप
पवारांना जमिनी लुटण्याचा पहिल्यापासून छंद असून त्यांनी एकाची जमीन लुटून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवारांवर केला.
Gopichand Padalkar on Rohit Pawar : पवारांचा मूळ डीएनए फसवणुकीचा लबाडीचा आहे. पवारांना जमिनी लुटण्याचा पहिल्यापासून छंद असून त्यांनी एकाची जमीन लुटून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवारांवर केला. घोटाळ्याचा आरोप करत गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केले.
पवारांना जमिनी लुटण्याचा पहिल्यापासूनचा छंद
पडळकर म्हणाले की, "कृष्णा जायबाय हे मुंबई हायकोर्टात वकील आहेत. ते माझ्याकडे आले होते. रोहित पवार यांनी त्यांची फसवणूक केली आहे. पवारांना जमिनी लुटण्याचा पहिल्यापासूनचा छंद आहे. कृष्णा जायबाय हे कर्जत तालुक्यातील दुरगावमधील आहेत. संस्थांच्या, सरकारच्या, देवस्थानाच्या जमिनी लुटण्याचा पहिल्यापासूनचा छंद आहे. रोहित पवार यांनी कृष्णा जायभाय यांची दोन एकर जमीन खरेदी करून घेतली. त्यांना एक रुपया दिला नाही. हे प्रकरण 20 ऑक्टोबर 2021 रोजी झालं आहे. हा व्यवहार 52 लाख रुपयांना ठरला. रोहित पवार यांनी चेक दिला होता. मात्र तो चेक बाउन्स झाला. ही जमीन रोहित पवार यांनी तिसऱ्या व्यक्तीला अडीच कोटी रुपयांना विकली. बारामती ॲग्रो लिमिटेड या कंपनीने याचे संचालक रोहित पवार आहेत. पवारांचा मूळ डीएनए फसवणुकीचा लबाडीचा आहे.
जमीन अडीच कोटी रुपयांना दुसऱ्याला विकली
त्यांनी सांगितले की, रोहित पवार यांनी 52 लाख रकमेचा चेक दिला पण दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती बँकेत गेली असता त्यांचा चेक बाऊन्स झाला. त्यानंतर त्यांनी बारामती अॅग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला पण त्यांना टोलवाटोलवी केली आणि 2023 मध्ये ती जमीन अडीच कोटी रुपयांना दुसऱ्याला विकली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या खात्यात 52 लाख रुपये पाठवण्यात आले. यात काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कोर्टात दावा दाखल केला. कोर्टातदेखील त्यांच्यासोबत दगाफटका झाल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे रोहित पवारांचा मूळ डीएनए फसवणूकीचा आणि भ्रष्टाचाराचा असल्याचं सिद्ध झालं आहे, असा आरोप त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या