एक्स्प्लोर

Video: मी सब कॉन्सियस माईंडने निर्णय घेतला, घायवळच्या बंदुक परवान्याबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण

घायवळ परवानाप्रकरणी योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, त्यांना कदाचित माहिती नसेल परवाना देताना ते संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीने ते इश्यू केलं जातं.

मुंबई : पुण्यातील निलेश घायवळ (Nilesh ghayawal) प्रकरणावरुन सध्या राज्यातील वातावरण तापलं असून पुणे गुंडगिरीमागे राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचे समोर येत आहे. निलेश घायवळ याच्या भावाला बंदुक परवाना देताना थेट गृहराज्यमंत्र्यांकडूनच आदेश आल्याने पोलिसांनी हा परवाना दिल्याचं सांगितलं जात आहे. आता, याप्रकरणी, योगेश कदम (Yogesh kadam) यांनी परवान्याबाबत स्पष्टीकरण दिलं असून शिवसेना नेते रामदास कदम यांनीही भूमिका मांडली आहे. तसेच, विधिमंडळातील एका नेत्याच्या सांगण्यावरुन हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही याप्रकरणी विधिमंडळ सभापती राम शिंदे यांचे नाव घेतल होते. 

घायवळ परवानाप्रकरणी योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, त्यांना कदाचित माहिती नसेल परवाना देताना ते संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीने ते इश्यू केलं जातं. याबाबत सविस्तर माहिती घेऊन मी पत्रकार परिषद घेईल. मी सोशल मीडियातून स्पष्टीकरण दिलंय. मी या खुर्चीवर बसल्यापासून प्रलंबित गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला परवाना देण्याबाबत माझ्याकडून शिफारस झालेली नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम आजपर्यंत आमच्याकडून कधी झालेलं नाही, यापुढेही कधी होणार नाही, असे गृहराज्यमंत्री कदम यांनी म्हटलं. म्हणून, जे काही गुन्हे दाखल होते, तरीही लायसन्स कसे दिले ह्या सर्व आरोपांची माहिती मी लवकरच देईन.

मी सब कान्सियस माईंडने हा निर्णय घेतला

जेव्हा अपील केली जाते, ती वैयक्तिक अपील असते. त्यामुळे, शेवटी त्या वक्तीचं कॅरेक्टर कसं आहे हे पाहिलं जातं. सचिन घायवळवरती 15-20 वर्षांपूर्वी जे गुन्हे दाखल होते, त्या गुन्ह्यातून 2019 मध्ये न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामध्ये, सेटलमेंटसुद्धा नाही, हे सगळे लक्षात घेऊनच मी सब कॉन्सियस माईंडने हा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरणही योगेश कदम यांनी दिले आहे.

रामदास कदमांचे राम शिंदेंकडे बोट

उद्धव ठाकरेंचे अर्धवट वकील अनिल परबांनी अकलेचे दिवे पाजळले आहेत, योगेश कदम याला नेहमी टार्गेट केले. खेडमध्ये अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद दिली. उद्धव ठाकरे यांना भेटून योगेश कदम यांनी मला त्रास दिला जात असल्याचे म्हटले होते. योगेश कदम मंत्री झाल्याने यांना पोटशूळ उठले, असे म्हणत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वडिल आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुण्यातील घायवळ प्रकरणावर भाष्य केले. कुठलीही केस घायवळवर नव्हती, तो शिक्षक, बिल्डर असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेऊ शकतो. पण, तो काय तुला विचारून निर्णय घेणार का, असा सवालही रामदास कदम यांनी अनिल परबांना विचारला. विधिमंडळात असलेल्या मंत्र्यांना आदेश देणाऱ्या व्यक्तीने योगेश कदम यांना सांगितल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांचे नाव मुख्यमंत्री यांना पाठवले आहे, त्यांनी शिफारस केल्यानंतर निर्णय घेतल्याचे सांगत रामदास कदम यांनी विधानसभा सभापती राम शिंदे यांच्याकडेच बोट दाखवले आहे.

दरम्यान, अनिल परबांनी आरोप केले की वाळू काढली, पण घमेलेभर वाळू काढली नाही. 35 वर्षे झालं हा बार आहे, तो डान्सबार नव्हता. आम्ही पैशांसाठी खालच्या लेवलवर जाणार नाही. हॅाटेल ड्रमबीड बार कुणाचा आहे, ठाकरे कुटुंबाचा आहे. आता तो का बंद आहे, कारण लायसन्स रद्द झाले, असेही रामदास कदम यांनी म्हटले.

हेही वाचा

महसूलमंत्र्यांची धाड, कार्यालयात सापडले 5 हजार; अखेर सह दुय्यम निबंधकाचे निलंबन, आदेश जारी

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Amol Mitkari on Ajit Pawar CM: मोठी बातमी : पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
Maharashtra CM: पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
Bollywood Actor Struggle Life: ना हीरो ना विलन, इंडस्ट्रीचा असा दिग्गज ज्यानं 70 वर्षांच्या करिअरमध्ये धर्मेंद्र-बिग बींनाही पाजलं पाणी; आज मुलंही सुपरस्टार
ना हीरो ना विलन, इंडस्ट्रीचा असा दिग्गज ज्यानं 70 वर्षांच्या करिअरमध्ये धर्मेंद्र-बिग बींनाही पाजलं पाणी; आज मुलंही सुपरस्टार
Embed widget